विशेष प्रतिनिधी
पुणे : नृत्यांगना गौतमी पाटील हिला अपघातप्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी थेट पोलीस उपायुक्त (डीसीपी) संभाजी कदम यांना फोन करून कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.
पुण्यातील मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वडगाव पुलाजवळ 30 सप्टेंबरला एका हॉटेल समोर होती. यामध्ये चालकासह दोन प्रवासी होते. त्यावेळी या रिक्षाला गौतमी पाटीलच्या भरधाव कारने जोरात धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी झाले होते. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.
मात्र या अपघातानंतर गौतमी पाटील किंवा तिच्या टीमने कोणतीही दखल घेतली नाही. तसेच रिक्षाचालकाकडून देखील आरोप करण्यात आला आहे की, पोलीस देखील या प्रकरणी सहकार्य करत नाहीत. दरम्यान ही कार स्वतः गौतमी पाटीलच्या नावावर आहे. त्यामुळे कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन लावत दोशींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता गौतमी पाटीलवर काय कारवाई होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान या प्रकरणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आक्रमक झाली आहे. यासाठी ठिय्या आंदोलन केले. कारण पोलिसांनी गौतमीला चौकशीसाठी 30 सप्टेंबरला बोलावल्याची माहिती होती. पण ती चौकशीसाठी न येता शो करत महाराष्ट्रामध्ये फिरत होती. त्यामुळे गौतमीला अटक व्हावी अशी मागणी केली जात आहे.
Will Gautami Patil be arrested? Chandrakant Patil calls DCP after accident victims complain in Pune accident case
महत्वाच्या बातम्या
- Ravindra Dhangekar चंद्रकांतदादा गुन्हेगारांना पाठीशी का घालतात, रवींद्र धंगेकरांचा थेट सवाल
- Uddhav Thackeray : मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? आत्मचिंतन करा : एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
- Congress : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर आंदोलन करणार
- Ajit Pawar : अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, तासभर चर्चा झाल्याने राजकीय खळबळ