Chandrakant Patil : मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही काँग्रेससोबत गेलात; चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावले

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : Chandrakant Patil  उद्धव ठाकरे आता आपल्यासोबत असायला पाहिजेत, असं म्हणण्याचा काहीच प्रश्न नाही. 2014 ते 2019 खूप सन्मान दिला, तरी त्यांनी आमच्या नेत्यांवर खालच्या भाषेत टीका केली. केवळ मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलात, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुनावले आहे.Chandrakant Patil

कोल्हापुरातील भुदरगड येथे आयोजित केलेल्या विजय संकल्प मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत कोर्टातील सगळ्या याचिका संपल्या. न्यायालयानं आता निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेवर आणि सर्व पंचायत समित्यांवर महायुतीचा अध्यक्ष असला पाहिजे. जिल्हा परिषद झाल्यानंतर लगेच महानगरपालिकेची तयारी आम्ही करणार आहोत.Chandrakant Patil

नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वाहनानं एका रिक्षाला धडक दिल्याचं प्रकरण ताज आहे. यावर बोलताना पाटील म्हणाले, “गौतमी पाटीलच्या वाहनानं रिक्षावाल्याला उडवलं. यात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. माध्यमांनी अपघाताच्या अनेक बातम्या लावल्या. कारवाई करणार की नाही असे अनेक प्रश्न उपस्थित केलेत. संबंधित रिक्षा चालकाची मुलगी माझ्या ऑफिसमध्ये आली. त्यानंतर मी डीसीपींना फोन लावला. मात्र त्या वाहनामध्ये गौतमी पाटील नव्हती असं समोर आलं. मात्र यावरून विरोधकांनी टीका सुरू केली. या प्रकरणावर रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर पाटील म्हणाले, आमदार रोहित पवारांना काय काम धंदा आहे. स्वतःची थोडी तरी पत राखून बोलत जा बाबा. मी काय करायचं हे रोहित पवार यांनी मला शिकवण्याची गरज नाही. कोणत्या प्रकरणात आम्ही काय भूमिका घेतो हे ढोल वाजवून सांगायची सवय आम्हाला नाही.

सांगलीमध्ये शरद लाड यांचा पक्षप्रवेश मंगळवारी होणार आहे. कोल्हापूर आणि सांगलीत मंगळवारी मोठे पक्षप्रवेश होणार आहेत. शरद लाड यांनी पदवीधरच्या उमेदवारीवर हक्क सांगितला आहे. त्यांचे वडील विद्यमान आमदार असल्यामुळं आणि जास्तीत जास्त मतदान नोंदणी असल्यानं त्यांनी उमेदवारीवर हक्क सांगितला आहे. आज संध्याकाळपर्यंत प्रवेश करणाऱ्या कोल्हापुरातील नेत्याचं नाव समोर येईल. मी कोल्हापुरातून कधीच लक्ष काढलं नव्हतं. मला पक्ष जी जबाबदारी देतो, ती मी पार पाडतो. पश्चिम महाराष्ट्रावर मला लक्ष केंद्रित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे,” अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

You went with Congress for the Chief Minister’s post; Chandrakant Patil tells Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या