विशेष प्रतिनिधी
जळगाव : जागावाटपात तडजोड करतो. कमी जागा लढवतो. पण युती करा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती झाली नाही, तर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मरून जातील, असे साकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला घातले आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, “भाजपचे नेते आम्हाला जाहीरपणे युती करायची असे सांगतात, पण एकांतात मात्र स्वबळाची भाषा बोलतात.” जिल्हा परिषद निवडणुकीत सध्या वेगवेगळे वारे वाहत आहेत. मात्र, आमदारकी आणि खासदारकीच्या निवडणुकीत युती होते, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये का नाही?
युती झाली नाही तर कार्यकर्ते मरून जातील, अशी भीती व्यक्त करत त्यांनी भाजपला युती करण्याचे आवाहन केले: “तुम्ही हवे तर 100 जागा लढा, आम्ही आमच्या ताकदीनुसार 50 जागा लढतो, पण युती करा. दोन-चार जागा इकडे-तिकडे करा, पण कार्यकर्त्याला मोठे करण्याची हीच निवडणूक संधी असते. त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी सगळ्यांनी विचार केला पाहिजे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
गुलाबराव पाटील म्हणाले की, राजकारणात विरोधक असणे आवश्यक आहे. विरोधक हे होकायंत्राप्रमाणे मार्गदर्शक असतात. “त्यांनी केलेली टीका आपल्यासाठी मार्गदर्शक ठरते, त्यामुळे त्याचा फायदा होतो.” गेल्या वर्षभरापासून विरोधक आमच्यावर ‘गद्दार’ म्हणून टीका करत आहेत. “अजूनही ती टीका होत आहे. आमचे काम आहे, ती टीका ऐकण्याचे, जो नेता सलग तीन-चार वेळा निवडून येतो, तोच खरा नेता असतो.
Form an alliance, otherwise the workers will die, Gulabrao Patil’s message to BJP
महत्वाच्या बातम्या
- Ravindra Dhangekar चंद्रकांतदादा गुन्हेगारांना पाठीशी का घालतात, रवींद्र धंगेकरांचा थेट सवाल
- Uddhav Thackeray : मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? आत्मचिंतन करा : एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
- Congress : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर आंदोलन करणार
- Ajit Pawar : अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, तासभर चर्चा झाल्याने राजकीय खळबळ