विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे विद्यमान क्रीडा मंत्री आणि माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवारांविरोधात कोर्टात धाव घेतली. व्हायरल व्हिडीओमुळे निर्माण झालेल्या वादामुळे आपली शेतकरी आणि पक्षामध्ये प्रतिमा डागाळली असल्याचा आरोप करत, कोकाटे यांनी रोहित पवार यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. Manikrao Kokate
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानपरिषदेत मोबाइलवर पत्ते खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा खळबळ माजली होती. रोहित पवार यांनी या प्रकरणावरून कोकाटेंवर जोरदार टीका करत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता माणिकराव कोकाटे यांनी न्यायालयात धाव घेत, रोहित पवारांच्या माफीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणी 9 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
माणिकराव कोकाटे यांनी आज न्यायालयात आपला जबाब नोंदवला असून, यानंतर माध्यमांशी बोलताना आपली बाजू सविस्तर मांडली. सविस्तर मांडली. माझ्यावरील आरोप निराधार आहेत. मी रमी खेळत नव्हतो. मला रमी खेळता येतही नाही. माझी बदनामी करण्यासाठी जाणीवपूर्वक ही गोष्ट पसरवली गेली. जेव्हा हे आरोप झाले, तेव्हा मी माध्यमांसमोर माझी भूमिका स्पष्ट केली होती. तरीही रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या वकिलांतर्फे त्यांना माफी मागण्याची नोटिसही पाठवली पण त्यांनी त्याचीही खिल्ली उडवली. त्यामुळे मला कायदेशीर पातळीवर जाण्याशिवाय पर्याय उरला नाही, असे माणिकराव कोकाटे म्हणाले.
या आरोपांमुळे शेतकऱ्यांमध्ये आणि माझ्या पक्षात माझी प्रतिमा डागाळली गेली. पक्षाच्या नेत्यांचीही बदनामी झाली आहे आणि माझीही बदनामी झाली. अशा स्थितीत माझी बाजू लोकांसमोर मांडण्यासाठी मला न्यायालयात याचिका दाखल करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यानुसार आज न्यायालयात माझा जबाब नोंदवण्यात आला आहे. आता रोहित पवारांनी माफी मागणे आवश्यक आहे. असे ते म्हणाले.
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांनी यावेळी बोलताना रोहित पवारांवर प्रश्नांची उलट सरबत्ती केली. जर रोहित पवार विधानपरिषदेचे सदस्य नाहीत आणि त्यांना परिषदेत येण्याची परवानगी नाही, तर मग हा फोटो नेमका कुणी काढला? त्याचे नाव काय आहे? रोहित पवारांना हा फोटो कसा आणि कुठून मिळाला? विधानपरिषदेतील हा फोटो माध्यमांपर्यंत कसा पोहोचला? असे प्रतिप्रश्न माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवारांना केले.
तसेच हे सर्वकाही अद्याप गुलदस्त्यात आहे. त्याची चौकशी पोलिसांकडून चालू आहे. यासंदर्भातली माहिती रोहित पवारांनी त्यांच्या जबाबात नोंदवणे आवश्यक आहे, असे माणिकराव कोकाटे यावेळी म्हणाले.
Rohit Pawar apologizes, Manikrao Kokate moves
महत्वाच्या बातम्या
- Ravindra Dhangekar चंद्रकांतदादा गुन्हेगारांना पाठीशी का घालतात, रवींद्र धंगेकरांचा थेट सवाल
- Uddhav Thackeray : मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? आत्मचिंतन करा : एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
- Congress : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर आंदोलन करणार
- Ajit Pawar : अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, तासभर चर्चा झाल्याने राजकीय खळबळ