राघव चढ्ढा यांच्यासह सात खासदारांना अपात्र ठरवण्याची आपची मागणी, ही दिली कारणे

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल यांच्या आम आमदी पक्षाच्या राज्यसभेच्या 10 पैकी 7 खासदारांनी भाजपचं कमळ हाती घेतल्याने आपला मोठा धक्का बसला आहे. या खासदारांच्या अपात्रतेची मागणी आपने केली आहे. Raghav Chadha

खासदार राघव चढ्ढा , अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत पक्ष सोडत असल्याचं जाहीर केलं. त्यांच्यासोबतच हरभजन सिंग,विक्रम सहानी, स्वाती मालीवाल,राजेंद्र गुप्ताही आपला रामराम ठोकणार असल्याचं चढ्ढा यांनी जाहीर केलं. तसेच आपची साथ सोडतानाच राज्यसभेत आम आदमी पक्षाचे भाजपात विलीनीकरण करण्यात आल्याचं राघव चढ्ढांनी सांगितलंय. राघव चढ्ढा, अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेशही केला आहे.



आता आपच्या भाजपात विलीनीकरणावर महत्वाची माहिती समोर आली आहे. आपच्या राज्यसभेत विलीनीकरणाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे खासदारांच्या अपात्रतेचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. राज्यसभा सचिवालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विलीनीकरणाशी संबंधित सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत. आप (AAP) खासदारांच्या पत्रात सात सदस्यांची यादी आहे, हे पत्र भाजपकडे प्राप्त झाले आहे आणि त्याची औपचारिकपणे दखल घेण्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रिया राज्यसभा अध्यक्षांनी देखील मंजूर केली आहे.दहाव्या अनुसूचीच्या तरतुदींनुसार, विलीनीकरणासाठी दोन-तृतीयांश बहुमत आवश्यक आहे. सध्याच्या प्रकरणात ही अट पूर्ण झाली आहे, त्यामुळे अपात्रतेचा प्रश्न उद्भवत नाही.

आम आदमी पक्षाने (आप) याला नियमांचे उल्लंघन म्हटले आहे. ‘आप’चे राज्यसभा प्रतोद एन. डी. गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, ते राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्या विरोधात राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र सादर करणार आहेत. या तिन्ही नेत्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे ‘आप’चे राज्यसभा प्रतोद या तिन्ही खासदारांविरुद्ध तक्रार दाखल करतील. हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, विक्रम साहनी आणि राजिंदर गुप्ता यांनी अद्याप भाजपमध्ये सामील झाल्याचे जाहीर केलेले नाही.

Aap seeks disqualification of seven mps including Raghav Chadha

महत्वाच्या बातम्या