विशेष प्रतिनिधी
मुंबई : Deepak Sawant शिवसेना ठाकरे गटाचे भांडूप विभागातील वॉर्ड क्रमांक 111 मधील नगरसेवक दीपक राजाराम सावंत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद जात पडताळणी समितीच्या निर्णयाद्वारे आणि आयुक्तांच्या आदेशाने रद्द करण्यात आले आहे. याबाबतची घोषणा महापौर रितू तावडे यांनी आज गुरुवारी (18 जून) महापालिका सभागृहात केली. त्यामुळे महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांचे संख्याबळ 65 वरून 64 वर घसरले आहे. मुंबई महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या 227 पैकी 79 नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र बनावट आणि इतर कारणांमुळे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यापैकी एक शिवसेनेचे भांडूप येथील वॉर्ड क्रमांक 111 मधून निवडून आलेले ठाकरे गटाचे नगरसेवक दीपक सावंत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांना नगरसेवक पदाला मुकावे लागणार आहे.Deepak Sawant
सहाय्यक निवडणूक आणि नगर शुल्क अधिकारी यांनी 18 जून रोजी महापालिका सचिव यांना दिलेल्या पत्रानुसार भांडूप येथील वॉर्ड क्रमांक 111 चे नगरसेवक दीपक राजाराम सावंत यांनी 27 डिसेंबर 2025 रोजी निवडणूक अधिकारी यांना सादर केलेले जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रत्नागिरी यांनी 15 जून रोजी अवैध ठरवले आहे. त्याबाबतचे पत्र महापालिका सचिव यांना पाठविण्यात आले आहे. त्याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त यांच्या आदेशाने आणि महापालिका कायदा 1888 च्या कलम 16/1 क अ अनुसार दीपक राजाराम सावंत यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात येत असल्याची घोषणा महापौर रितू तावडे यांनी आज महापालिका सभागृहात केली. त्यामुळे सभागृहात उपस्थित शिवसेनेच्या गोटात स्मशान शांतता पसरली होती. तर भाजप – शिवसेना महायुतीच्या गोटात मात्र आनंदी आनंद दिसून आला.
यावर, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी आक्षेप घेतला असता महापौर रितू तावडे यांनी, न्यायालयाचे आणि महापालिका आयुक्त तथा जात पडताळणी समितीचे आदेश असल्याचे महापौरांनी सांगितले असल्याचे महापौर रितू तावडे यांनी ठासून सांगितले. मात्र दीपक सावंत यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले नसल्याचे सांगत विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी विरोध दर्शविण्याचा प्रयत्न केला. तसेच, सदर प्रकरणी सभागृहात घोषणा करण्याची एवढी घाई का केली जाते, असा सवाल उपस्थित करीत त्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. तसेच, जात पडताळणीसाठी सहा महिन्याची मदत देण्यात आलेली असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. सदर प्रकरण न्यायालयात गेले असून न्यायालयाचा निकाल येईपर्यंत पालिकेने घाई करून निर्णय घेऊ नये. तोपर्यंत वाट बघावी, अशी सूचना देखील किशोरी पेडणेकर यांनी यावेळी केली.
Thackeray faction suffers setback in BMC as Deepak Sawant’s caste certificate declared invalid
महत्वाच्या बातम्या
- Nagpur : कर्करोगावरील उपचार, संशोधनासाठी नागपूरला हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रोन प्रकल्प
- महाराष्ट्र पोलिसांना मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, केंद्र सरकारकडून योजना मंजूर
- मुठा नदीपात्र स्वच्छता अभियानात पर्यावरणप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग
- शपथा आणि शिवबंधन नव्हे, माणुसकीच्या बंधनाने खासदार टिकतात, नवनाथ बन यांचा टोला