उध्दव ठाकरे यांना लपून छपून भेटण्याची गरजच काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट

विशेष प्रतिनिधी

नागपूर : उध्दव ठाकरे यांची जर भेट घ्यायची असेल तर ती उघडपणे घेता येते, लपून-छपून भेटण्याची कोणतीही गरज नाही. आमच्यात असे कोणतेही विषय नाहीत की ते लपवावे लागतील, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासाेबत कथित भेटीच्या चर्चांना पूर्णपणे नकार दिला. अशा बातम्या पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. Devendra Fadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची मध्यरात्री ‘वर्षा’ निवासस्थानी गुप्त भेट झाल्याचा दावा काही माध्यमांकडून करण्यात आला होता. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला राजकीय अर्थ लावले जाऊ लागले होते. या संदर्भातही फडणवीस यांनी ठाम भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, जर भेट घ्यायची असेल तर ती उघडपणे घेता येते, लपून-छपून भेटण्याची कोणतीही गरज नाही. आमच्यात असे कोणतेही विषय नाहीत की ते लपवावे लागतील, असे ते म्हणाले. त्यांनी या भेटीच्या चर्चांना पूर्णपणे नकार देत, अशा बातम्या पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला.



या कथित भेटीबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही सावध प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, ही भेट झाली की नाही हे संबंधित दोन नेतेच स्पष्ट करू शकतात. त्याचवेळी भाजपकडूनही ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे सांगण्यात आले. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी कोणतीही अशी भेट घडलेली नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान नागपूरमध्ये पार पडलेल्या एका धार्मिक कार्यक्रमानंतर बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याशी संबंधित एक प्रसंग सांगितला. शिवाजी महाराज थकल्याने त्यांनी राजशकट समर्थ रामदास यांच्याकडे साेपविल्याचे ते म्हणाले हाेते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की, इतिहासात अशा प्रकारचा कोणताही ठोस दाखला उपलब्ध नाही. महापुरुषांभोवती अनेक लोककथा तयार होतात, त्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्वरूपात सांगितल्या जातात. रामायण आणि महाभारत यांसारख्या ग्रंथांमध्येही विविध लोकपरंपरा आढळतात, त्यामुळे अशा कथांना इतिहास म्हणून स्वीकारताना काळजी घ्यावी लागते .

फडणवीस पुढे म्हणाले की, आपण ज्या ऐतिहासिक ग्रंथांचा अभ्यास केला आहे किंवा जे अधिकृत संदर्भ उपलब्ध आहेत, त्यात अशा घटनेचा उल्लेख नाही. त्यामुळे लोककथा आणि इतिहास यातील फरक ओळखणे आवश्यक आहे.

Is there any need to meet Uddhav Thackeray secretly? Chief Minister Devendra Fadnavis clarified

महत्वाच्या बातम्या