देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट महागात; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर पोलिसांची कारवाई

विशेष प्रतिनिधी

पुणे: मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांचे आक्षेपार्ह मोर्फ केलेला फोटो सोशल मीडियावर शेअर करणे आणि नक्षलवादी कमांडरचे उदात्तीकरण केल्याप्रकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांकडून महादेव बालगुडे याला बारामती मधून ताब्यात घेण्यात आले आहे.

बारामती येथील महादेव बालगुडे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मीडिया विंगचे राज्याचे प्रमुख पदाधिकारी आहेत.महादेव बालगुडेंवर फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा खराब केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो मोफ करून तो सोशल मीडियावर प्रसारित करणे, आणि मुख्यमंत्र्यांना चपलेने मारण्याचे आव्हान करून राज्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सदरील तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच प्रतिबंधित माओवादी कमांडर माडवी हिडमा याच्याबद्दल सहानुभूती दर्शवणारी पोस्ट महादेव बालगुडे यांनी केल्याचे तक्रारी नमूद करण्यात आले आहे.पुण्यातील वकील बसवराज यादवाड त्यांच्याकडून 22 एप्रिल रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती.

दरम्यान,गुरुवारी पोलिसांकडून महादेव बालगुडे यांना ताब्यात घेण्यात आले.शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर,त्यांना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Offensive post against Devendra Fadnavis is expensive; Police action against NCP office bearer

 

महत्वाच्या बातम्या