Nasrapur case : नसरापूर प्रकरणाचा तपास आता SIT कडे:दोन महिला अधिकाऱ्यांसह 6 वरिष्ठ पोलिसांचे पथक करणार तपास

विशेष प्रतिनिधी

पुणे: Nasrapur case नसरापूर येथे 65 वर्षीय नराधमाने चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नसरापूर येथे 65 वर्षीय नराधमाने चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. जनक्षोभ इतका तीव्र होता की, शनिवारी संतप्त नागरिकांनी पुणे येथील नवले पूल परिसरात रस्ता रोको आंदोलन करत बंद पाळला होता. नागरिकांच्या भावना आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने या प्रकरणाचा तपास जलद गतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.Nasrapur case



 

नसरापूर घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. जनक्षोभ इतका तीव्र होता की, शनिवारी संतप्त नागरिकांनी पुणे येथील नवले पूल परिसरात रस्ता रोको आंदोलन करत बंद पाळला होता. नागरिकांच्या भावना आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने या प्रकरणाचा तपास जलद गतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी त्याला “काही तक्रार आहे का?” अशी विचारणा केली. त्यावर आरोपीने अत्यंत निर्लज्जपणे उत्तर देत म्हटले की, “किरकोळ भांडणातून मला या प्रकरणात विनाकारण गोवण्यात आले आहे.” आपल्या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. मात्र, तपासातील निष्पन्न तथ्ये आणि चिमुकलीचा मृतदेह ज्या अवस्थेत सापडला, त्यावरून त्याचा हा बनाव न्यायालयात टिकू शकला नाही.
आरोपीला पुणे न्यायालयाने 7 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली.

Nasrapur case handed to SIT, six member team including two women officers to probe

महत्वाच्या बातम्या