बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पहिल्याच फेरीत 6500 मतांची आघाडी

विशेष प्रतिनिधी

बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत. पहिल्याच फेरीत त्यांनी सुमारे 6500 मतांची आघाडी घेतली असून दुसऱ्या फेरीतही त्यांची आघाडी कायम असल्याचे चित्र आहे.

मतमोजणीच्या सुरुवातीलाच सुनेत्रा पवार यांना तब्बल 99 टक्के मते मिळाल्याचे समोर आले असून, त्यामुळे त्यांच्या विक्रमी विजयाबाबत चर्चा रंगू लागली आहे. बारामतीमध्ये त्या किती मोठ्या मताधिक्याने विजयी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी बारामतीतून 1 लाख 65 हजार मताधिक्याने विजय मिळवला होता. यंदा हा विक्रम मोडण्यासाठी सुनेत्रा पवार यांना एकूण मतदानांपैकी किमान 55 टक्के मते मिळवणे आवश्यक आहे.

बारामती पोटनिवडणुकीत एकूण 2 लाख 23 हजार 705 इतके मतदान झाले आहे. विक्रमी मताधिक्य मिळवण्यासाठी सुनेत्रा पवार यांना सुमारे 1 लाख 23 हजार 265 मतांची गरज आहे. सध्याच्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर हा विक्रम मोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



बारामतीत पहिल्या अखेर
बारामती उमेदवारांना पडलेली मते खालील प्रमाणे…

सुनेत्रा पवार 8868
चंद्रकात वाघमोडे 5
अभिजीत बिचकुले 7
करूणा मुंडे 10
नोटा 28

Sunetra Pawar takes 6500 vote lead in first round of Baramati bypoll

महत्वाच्या बातम्या