विशेष प्रतिनिधी
पुणे : दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे वडिलांनीच आपल्या ९ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांताराम दुर्योधन चव्हाण (वय ३३, रा. देऊळगाव राजे) असे आरोपीचे नाव असून आपल्या 9 वर्ष वयाच्या मुलीने तिच्या भावाच्या शाळेच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याचा राग मनात धरून अत्यंत क्रूर कृत्य केले
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ मे २०२६ रोजी पहाटे सुमारे ३.१५ वाजण्याच्या सुमारास हनुमान वस्ती, काळे वस्तीजवळ, देऊळगाव राजे येथे ही घटना घडली. आरोपी शांताराम दुर्योधन चव्हाण (वय ३३, रा. देऊळगाव राजे) याने आपल्या मुलगी अनामिका (वय ९) हिने तिच्या भावाच्या शाळेच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याचा राग मनात धरून अत्यंत क्रूर कृत्य केले.
रागाच्या भरात आरोपीने लाकूड कापण्याच्या मशीनचा वापर करून मुलीच्या गळ्यावर, डोक्यावर व शरीरावर वार करत तिची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलीचा मृतदेह कपड्यात गुंडाळून स्वतःचे घर पेटवून देत अर्धवट जाळण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणात आरोपीसोबत असलेल्या चिंगु शिंदबाद भोसले (रा. देऊळगाव राजे) हिनेही घटनेची माहिती कोणालाही न सांगण्यास सांगून पोलिसांपासून माहिती लपवण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे.
याप्रकरणी पोलीस शिपाई निलेश आत्माराम फडणीस (दौंड पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली असून, दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम १०३(१), २३८, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले करत असून पुढील तपास सुरू आहे.
Father kills 9-year-old daughter in Daund, sets house on fire to destroy evidence
महत्वाच्या बातम्या
- ‘मला खोटं गोवलं’ आरोपीचा दावा फेटाळला; नसरापूर प्रकरणात तपास अधिक तीव्र
- पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा ३१ मेपर्यंत सुरू होण्याची शक्यता…
- विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार, अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद
- टीसीएस बीपीओ प्रकरण: निदा खानचा अटकपूर्व जामीन फेटाळला, अटकेची टांगती तलवार