विशेष प्रतिनिधी
पुणे: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन म्हणजेच एसटीच्या वतीने सवलतधारक प्रवाशांना NCMC cars म्हणजे स्मार्ट कार्डचे वितरण सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान,काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलत धारक प्रवाशांना देण्यात येणाऱ्या एनसीएमसी स्मार्ट कार्डची जास्त पैसे घेऊन विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची दखल घेऊन जात दर अकरणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात येतील,असा इशारा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
नवीन NCMC कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी १९९ रुपये, तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी १४९ रुपये असा दर ठरवण्यात आला आहे.राज्यातील सर्व आगारातील व्यवस्थापकांना ही कार्यपद्धती एकदम काटेकोरपणे राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
महिला,ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी आणि कार्ड वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलती जास्त पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने देण्यासाठी NCMC कार्ड कार्यप्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आता महिला,जेष्ठ नागरिक आणि ‘ अमृत ‘ जेष्ठ नागरिक यांची नोंदणी व कार्ड वितरण प्रक्रिया सुरू झालेली आहे.
याशिवाय NCMC कार्डद्वारे तिकीट वितरण, कार्ड टॉप – अप आणि इतर व्यापारांसाठी एकसारखी कार्यपद्धती देखील निश्चित करण्यात आली आहे.यासाठी राज्यभरात ३००० हजारांपेक्षा अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे,राज्यातील प्रत्येक आगार आणि मोठ्या बसस्थानकावर हे कार्ड उपलब्ध करून देण्यात येत आहे.
नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड ( NCMC) म्हणजे काय?
एसटी बस मध्ये आधार कार्ड आणि ओळखपत्र दाखून अर्ध्या तिकीट प्रवास करणाऱ्या महिला आणि शंभर टक्के सवलत घेणाऱ्या जेष्ठ नागरिकांना आता NCMC कार्ड गरजेचे आणि बंधनकारक करण्यात आले आहे.हे कार्ड असेल तर आता महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटीने प्रवास करता येणार आहे. NCMC कार्डमुळे प्रवास सुलभ,पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे.
MCMC card mandatory for ST travel; What is NCMC card?
महत्वाच्या बातम्या
- ‘मला खोटं गोवलं’ आरोपीचा दावा फेटाळला; नसरापूर प्रकरणात तपास अधिक तीव्र
- पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा ३१ मेपर्यंत सुरू होण्याची शक्यता…
- विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार, अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद
- टीसीएस बीपीओ प्रकरण: निदा खानचा अटकपूर्व जामीन फेटाळला, अटकेची टांगती तलवार