विशेष प्रतिनिधी
पुणे: शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी एक थरारक कारवाई केली. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार गणेश शहाजी कसपटे (बक्कल नं. २७८१) याला दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. Police constable
कडले जात असताना आरोपी हवालदाराने तक्रारदाराच्या छातीचा चावा घेतला आणि पोलिसांना धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
तक्रारदार एका खाजगी कंपनीत काम करतात. त्यांच्या कंपनीच्या मालकाविरुद्ध हैदराबाद न्यायालयामध्ये चेक बाऊन्सची केस सुरू असून, त्या प्रकरणात मालकाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट निघाले होते. या वॉरंटची बजावणी न करण्यासाठी आणि मालकास अटक न करता मदत करण्यासाठी हवालदार गणेश कसपटे याने यापूर्वीच ७ मार्च २०२६ रोजी ५ लाख रुपये लाच स्वीकारली होती.
पुन्हा १ मे २०२६ रोजी, “वॉरंट परत आले असून अटक टाळायची असेल तर पुन्हा अडीच लाख द्यावे लागतील,” अशी मागणी कसपटेने केली. तक्रारदाराचे मालक आजारी असल्याने तक्रारदाराने हवालदाराची भेट घेतली. तडजोडीअंती २ लाख रुपये ठरले आणि ५ मे रोजी लाच मागणीची पडताळणी झाली असता दीड लाख रुपये देण्याचे निश्चित झाले.
बुधवार, ६ मे २०२६ रोजी दुपारी २ वाजता बोट क्लब रोडवरील सुलक्स कल्पतरू गार्डन सोसायटीसमोर ‘एसीबी’ने सापळा रचला. हवालदार कसपटे याने तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच स्वीकारली आणि त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या पथकाने त्याला झडप मारली.
आपण पकडले गेलो आहोत हे लक्षात येताच कसपटे याने हिंसक पवित्रा घेतला. त्याने तक्रारदाराच्या छातीला जोरात चावा घेतला आणि ‘एसीबी’च्या पथकाला धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने मोठ्या शिताफीने त्याला जागीच पकडून ताब्यात घेतले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुण्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त भारती मोरे आणि पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर व त्यांच्या पथकाने यशस्वी केली.
Police constable bites complainant’s chest after trap; arrested while accepting Rs 1.5 lakh bribe
महत्वाच्या बातम्या
- सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला
- सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा 2024मधील विक्रम; १ लाख १२ हजार २६८ मतांनी आघाडीवर
- विजयचा दणका, स्टॅलिन यांच्यासह द्रमुक मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री पिछाडीवर
- बंगाल-आसाममध्ये भाजपची झेप; तामिळनाडूत थलपती विजयच्या पक्षाची ‘ब्लॉकबस्टर’ एन्ट्री, केरळमध्ये काँग्रेसला दिलासा