विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : PM Modi’ पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे जगभरात निर्माण झालेल्या आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना मोठे आवाहन करत पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर तातडीने कमी करण्याचे आवाहन केले आहे. हैदराबादमधील भाजपच्या जाहीर सभेत बोलताना मोदी म्हणाले की, भारताकडे मोठ्या प्रमाणात तेलसाठे नसल्याने जागतिक इंधन संकटाचा थेट परिणाम देशावर होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता जबाबदारीने वागण्याची वेळ आली आहे. PM Modi’
मोदी यांनी नागरिकांना ‘वर्क फ्रॉम होम’, कारपूलिंग, मेट्रोचा वापर आणि सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला. “ज्या शहरांमध्ये मेट्रो आहे, तिथल्या नागरिकांनी शक्य तितका मेट्रोचा वापर करावा. वाहनांचा अनावश्यक वापर टाळावा,” असे ते म्हणाले. PM Modi’
यावेळी त्यांनी पुढील एक वर्ष सोने खरेदी न करण्याचेही भावनिक आवाहन केले. सोन्याच्या आयातीमुळे देशाचे मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च होत असल्याचे सांगत मोदी म्हणाले की, “पूर्वी युद्धकाळात लोक सोन्याचे दान करत असत. आज दानाची गरज नाही, पण देशहितासाठी एक वर्ष सोने न खरेदी करण्याची प्रतिज्ञा घ्यावी.”
खाद्यतेलाचा वापर कमी करण्यावरही त्यांनी भर दिला. प्रत्येक कुटुंबाने तेलाचा वापर नियंत्रित केल्यास परकीय चलनाची बचत होण्याबरोबरच नागरिकांचे आरोग्यही सुधारेल, असे त्यांनी सांगितले. तसेच रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक शेतीचा स्वीकार करण्याचे आवाहन करत देशाने खतांवरील अवलंबित्व निम्म्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे, असेही मोदी म्हणाले.
परदेश दौरे काही काळ पुढे ढकलण्याचे आवाहन करत त्यांनी सांगितले की, जागतिक इंधन संकटामुळे भारतावर आर्थिक दबाव वाढत आहे. त्यामुळे लग्न, सुट्ट्या आणि इतर कारणांसाठी होणारे परदेश प्रवास काही काळासाठी टाळणे राष्ट्रहिताचे ठरेल.
पश्चिम आशियातील संघर्षाचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, पुरवठा साखळी सतत संकटात सापडत असल्याने जगभरातील अर्थव्यवस्था दबावाखाली आहेत. “देशभक्ती म्हणजे केवळ देशासाठी प्राण देणे नव्हे, तर देशासाठी जगणे आणि आपली जबाबदारी पार पाडणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले.
सभेत मोदी यांनी भाजपच्या वाढत्या राजकीय विस्ताराचाही उल्लेख केला. आसामपासून बंगालपर्यंत आणि पुदुचेरीपासून तेलंगणापर्यंत भाजपला मिळणारा वाढता पाठिंबा हा जनतेचा घराणेशाहीवरील अविश्वास आणि विश्वासार्ह नेतृत्वावरील विश्वास असल्याचा दावा त्यांनी केला.
तेलंगणात भाजप सरकार स्थापनेची भावना वाढत असल्याचे सांगत मोदी म्हणाले की, केंद्र सरकार राज्याच्या विकासासाठी अधिक वेगाने काम करेल. ऊर्जा सुरक्षा, रस्ते, रेल्वे आणि विमानतळांसह विविध पायाभूत प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“Save Fuel, Avoid Buying Gold for a Year”: PM Modi’s Big Appeal Amid Global Crisis
महत्वाच्या बातम्या
- १०५ दिवसांत मराठी शिका, अन्यथा १६ ऑगस्टपासून कारवाई; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा
- काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला; तमिळनाडूतील सत्तांतरावर मोदींचा हल्लाबोल
- अशोक खरात प्रकरणात चार मंत्र्यांवर गंभीर आरोप, नाना पटोलेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी
- भोंदू अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांची एसआयटीसमोर चौकशी