निदा खान आणि इम्तियाज जलील नातेवाईक; संजय शिरसाठ यांचा खळबळजनक आरोप…

विशेष प्रतिनिधी

पुणे: TCS कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणात मुख्य आरोपी निदा खानला संभाजी नगर येथून अटक करण्यात आली.शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी संभाजी नगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या प्रकरणात ‘ मास्टरमाइंड ‘ ठरवले आहे.

संजय शिरसाठ म्हणाले की,’ नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान ही पेड वर्कर होती. संभाजीनगर मधील स्थानिक एमआयएमच्या नगरसेवकांनी निदान खानला आश्रय दिला.निदा खान ज्या घरात राहत होती ते घर देखील अनधिकृत आहे.पुढील काही दिवसात त्या घरावर देखील कारवाई होईल.मात्र या संपूर्ण प्रकरणात इम्तियाज जलील हेच ‘ मास्टरमाइंड ‘ आहेत ‘.



निदा खान आणि इम्तियाज जलील नातेवाईक असल्याचा दावा..

निदा खान आणि इम्तियाज जलील हे नातेवाईक असल्याचा दावा शिरसाठ यांनी केला आहे.निदा खान ही इम्तियाज जलील यांच्या भावाच्या पत्नीची नातेवाईक असल्याचा आरोप संजय शिरसाठ यांनी केला आहे.तर, या प्रकरणाबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असल्याचे शिरसाठी यांनी स्पष्ट केले आहे.

निदा खानला आज नाशिकमधील नाशिक रोड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.पोलिस कोठडीत असताना निदा खानची स्वतंत्र्य आणि कुटुंबासोबत देखील चौकशी करण्यात आली होती.चौकशीदरम्यान नेमकी कोणती माहिती मिळाली आहे हे अद्याप उघड झालेले नाही.आजच्या सुनावणीत निदा खानची पोलिस कोठडी वाढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nida Khan and Imtiaz Jaleel are relatives; Sanjay Shirsath’s sensational allegation…

 

महत्वाच्या बातम्या