Devendra Fadnavis : राज्यात ३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

विशेष प्रतिनिधी

पुणे : Devendra Fadnavis राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. कर्जमाफी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून कॅबिनेट उपसमितीची बैठक पूर्ण झाली आहे. काही जिल्ह्यांकडून तांत्रिक माहिती मागविण्यात आली असून ती मिळताच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.Devendra Fadnavis

पुण्यात कृषी विभागाच्यावतीने कृषी महाविद्यालय येथे आयोजित दुसºया पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा-२०२६च्या समारोप व पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमांनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील वीजस्थितीबाबतही स्पष्टीकरण दिले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक राहुल महिवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.Devendra Fadnavis



महाराष्ट्रात आवश्यकतेपेक्षा अधिक वीज उपलब्ध आहे. काही भागात तांत्रिक बिघाडांमुळे तात्पुरत्या समस्या निर्माण होत असल्या तरी ऊर्जा संकट नाही. तर अमली पदार्थांचे संकट देशपातळीवरील गंभीर आव्हान आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली देशभर मोहीम राबवली जात असून महाराष्ट्र या कारवाईत आघाडीवर आहे. राज्याची तुलना उडता पंजाबशी करणे चुकीचे आहे. दरम्यान, खासदार पार्थ पवार यांच्या भेटीबाबत विचारले असता ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हा महायुतीतील मित्र पक्ष आहे. त्यामुळे ही भेट केवळ प्रशासकीय आणि राजकीय चर्चेपुरती मर्यादित आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

कांदा उत्पादकांना दिलासा

कांद्याच्या घसरत्या दरांवर उपाय म्हणून केंद्र सरकारने साडेबारा रुपये प्रति किलो दराने खरेदी सुरू केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी घटल्यामुळे दर कमी झाले असले तरी या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात आधार मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

Maharashtra government to announce farm loan waiver before June 30, says Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या