विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सर्व १६ जागा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील असून या जागांसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे.
या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत २५ मे ते १ जून असणार आहे, तर अर्जांची छानणी २ जून रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने या मतदारांतून होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकाही लांबल्या होत्या.
मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांपूर्वी पार पडल्याने विधानपरिषदेच्या या १६ जागांसाठीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. तसंच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठीही पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.
सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना आणि नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ.
Election dates announced for 16 Maharashtra Legislative Council seats
महत्वाच्या बातम्या
- सोलापूर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपचं पारडं जड; कुणाला मिळणार संधी?
- महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- पुण्यात कॅन्सर रुग्णालयाच्या उद्घाटनाआधीच वाद; श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे नाव दिल्याने चर्चा