विशेष प्रतिनिधी
मुंबई : Nitesh Rane राहुल गांधी हे पाकिस्तानी एजंट आहेत. ते पाकमध्ये बसलेल्या आपल्या बॉसला खूश करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलतात, अशी जहरी टीका भाजप नेते तथा मंत्री नीतेश राणे यांनी केली आहे.Nitesh Rane
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सध्या महागाई, इंधन दरवाढ, नीट पेपरफुटी आदी विविध मुद्यांवरून नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या प्रकरणी त्यांनी मोदींना चक्क महागाई मानवाची उपमा दिली आहे. या पार्श्वभूमीवर नीतेश राणे म्हणाले, राहुल गांधी एक पाकिस्तानी एजंट आहेत. ते पाकची भाषा आपल्या तोंडातून बोलतात. पाकला खुश करण्याची सर्व तयारी राहुल गांधी यांची आहे. ते तेथून येणारी स्क्रिप्ट येथे वाचून दाखवतात. पाकिस्तानातील आपल्या मालकाला खूश करण्यासाठी त्यांचा हस्तक राहुल गांधी येथे येतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलतो.Nitesh Rane
राज्यात अनेक ठिकाणी बकरीच्या मांसाच्या नावाने गोमांसाची खुली विक्री केली जात असल्याचाही आरोप करताना राणे म्हणाले, अनेक ठिकाणी बकरीच्या मांसाच्या नावाने गोमांसाची विक्री केली जात आहे. जनावरांची तस्करी सुरू आहे. तुम्हाला तुमच्याच धर्मातील जिहादींना आवर घालता येत नसेल, त्यांनी आमच्या हिंदू राष्ट्रात कसे वागावे हे शिकवता येत नसेल, तर आम्हाला जीआर काढून दंड ठोठावावा लागेल. त्यामुळे बकरी इदच्या नावाखाली कुणी आमच्या गो मातेकडे वाकड्या नजरेने पाहिले, तर त्यांचा मुक्काम थेट तुरुंगात असेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने एक शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार, गोमांसाशी संबंधित गुन्ह्यांत सहभाग असलेल्या व्यक्तींवर मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कायद्यातील कठोर तरतुदी थेट लागू केल्या जातील. पोलिसांनी या प्रकरणी विविध ठिकाणी संचलन सुरू केले आहे. नियमांचे उल्लंघन करण्याचा किंवा शरिया कायदा लागू करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यासंबंधी तुरुंगाची हवा खावी लागेल, असा इशारा राणे यांनी दिला.
नमाज रस्त्यावर अदा करायची असेल, तर आपण मशिदीच बंद करून टाकूया. आपल्या हिंदू राष्ट्रातील रस्ते लोकांच्या चालण्यासाठी आहेत. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी आहेत. पण सध्या रस्त्यांवर नमाज अदा केली जात आहे. मदरसेही सध्या दहशतवादाची केंद्र बनले आहेत, असे नीतेश राणे म्हणाले.
“Rahul Gandhi is a Pakistani agent, criticises Modi to please his bosses”: Nitesh Rane targets Congress leader
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश