विशेष प्रतिनिधी
पुणे : जेलमध्ये टाकले तरीही चालेल, पण आता विद्यार्थ्यांसाठी क्रांती झालीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या ‘ कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके यांनी मांडल्याचा दावा प्रसिध्द वकील असिम सराेदे यांनी केला आहे.
दाबके यांनी असीम सरोदे यांना मेसेज आणि फोन करून भारतातील सद्यस्थिती जाणून घेतली. सराेदे म्हणाले, मी अभिजितला स्पष्ट सांगितले की, सध्याचे सरकार जर बदल्याच्या भावनेतून कारवाई करणार असेल, तर तू भारतात येण्यापूर्वी विचार केला पाहिजेस.
अभिजित दाबके लवकरच भारतात येणार आहे. नीट परीक्षा घोटाळा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी अभिजित दीपकेने भारतात एका मोठ्या आंदोलनाची रणनीती आखली आहे.
गांधीवादी मार्गाने परिवर्तनाचा सल्लाविद्यार्थ्यांचे दुःख आणि त्यांच्यावरील अन्याय मांडण्यासाठीच कॉक्रोच जनता पार्टी’ उभी राहिली आहे, असे दीपके यांचे मत आहे. यावर सरोदे यांनी त्यांना प्रक्षोभक भाषणे टाळण्याचा आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांची साथ न सोडता महात्मा गांधींच्या अहिंसक मार्गाने आंदोलन करण्याचा मोलाचा सल्ला दिला, जो अभिजित दीपके यांनी मान्य केला.या आंदोलनासाठी दीपके यांनी पुण्यातील डॉ. विश्वंभर चौधरी, निखिल वागळे यांच्यासह प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज आणि लडाखचे आंदोलक सोनम वांगचुक यांनाही आमंत्रित केले आहे.
अभिजित दीपके हे भारतात येत असले तरी त्यांच्यासमोरील अडचणी कमी नाहीत. दीपके याला पाठिंबा किती आणि कसा मिळतो हे पाहणं सरकारची भूमिका असेल कारण थेट अटक करण्याची घाई सरकार करणार नाही. कदाचित अभिजित दीपके याला विमानतळावरून अटक होऊ शकते, असंही सरोदे म्हणाले.
यापूर्वी केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत त्यांचे १ कोटींहून अधिक फॉलोअर्स असलेले अधिकृत एक्स खाते बंद केले होते. याविरोधात दीपके यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.अभिजीत दीपकेने एक व्हिडिओ पोस्ट करत थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ६ जून रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर शांततापूर्ण आणि संविधानाच्या मार्गाने एकत्र येऊन देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आवाज उठवण्याचे आवाहन त्याने तरुणांना केले आहे.”
Even if you throw him in jail, it will work… Sarode claims that Abhijit Deepke played a role
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange : सरकारी शिष्टमंडळाशी चर्चेनंतर मनोज जरांगेंनी उपोषण केले स्थगित
- Baramati : विधवा महिलेचा छळ, बारामतीत विद्यमान नगरसेवकावर गुन्हा दाखल
- Ghatkopar : घाटकोपर येथील पालिका मराठी शाळा वाचविण्यासाठी हजारोंचा जनआक्रोश
- मराठा आरक्षणाबाबत संविधानाच्या चौकटीत बसणारा निर्णय, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन