अभिषेक की आम्ही? तृणमूल काॅंग्रेसच्या नाराज खासदारांचा ममता बॅनर्जींसमाेर पेच

विशेष प्रतिनिधी

काेलकत्ता : मी ममता बॅनर्जींसोबत आहे, पण जर त्या अभिषेकशिवाय पक्ष चालवू शकत नसतील, तर मी त्यांच्यासोबत नाही, हे आता त्यांनीच ठरवायचं आहे, असे म्हणत तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी अभिषेक की आम्ही असा पेच तृणमूल काॅंग्रेसच्या सर्वेसर्वाे ममता बॅनर्जी यांच्यासमाेर टाकला आहे.

कल्याण बॅनर्जी यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटलं की, “हा माझा घोर अपमान आहे. त्यांच्या (अभिषेक बॅनर्जी) अहंकारी वृत्तीने संपूर्ण पक्ष उद्ध्वस्त केला आहे, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे सगळं काही संपलं आहे. कठीण काळातही त्यांना रोज आपण ‘राजा’ असल्यासारखं वाटतं. जेव्हा मी पक्षासाठी आणि ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, अशा वेळी अभिषेक बॅनर्जी यांच्या या अहंकारी वृत्तीमुळे माझ्यासाठी काम करणं अशक्य झालं आहे.



मी ममता बॅनर्जींसोबत आहे, पण जर त्या अभिषेकशिवाय पक्ष चालवू शकत नसतील, तर मी त्यांच्यासोबत नाही, हे आता त्यांनीच ठरवायचं आहे, असा निर्वाणीचा इशारा देत कल्याण बॅनर्जी म्हणाले, तुम्ही असं कसं करू शकता? माझा कोणताही सल्ला घेतला गेला नाही. सर्व प्रकरणं एकाच व्यक्तीने हाताळली पाहिजेत का? मी कोर्टासमोर हजर होणार नाही. ज्येष्ठ वकिलासोबत कोणी अशी वागणूक देते का? ज्युनिअर वकील काय विचार करतील? किशोर दत्ता आणि सब्यसाची ज्युनिअर आहेत. त्यांच्या अहंकाराने संपूर्ण पक्ष उद्ध्वस्त केला आहे, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे.

कल्याण बॅनर्जी म्हणाले, “चुकीच्या दृष्टिकोनाने सर्व काही उद्ध्वस्त केलं आहे. कठीण काळातही मी त्यांना साथ दिली. पण आता माझ्यासाठी काम करणं कठीण झालं आहे आणि हे केवळ अभिषेक बॅनर्जी यांच्या अहंकारामुळे झालं आहे. आता दीदींनीच काय करायचं ते ठरवावं. मी ममता बॅनर्जींसोबत आहे. पण आता मला सोबत ठेवायचं की अभिषेक बॅनर्जींना, हे त्यांनीच ठरवावं.

Abhishek or Us? Disgruntled TMC MPs Put Mamata Banerjee in a Dilemma

महत्वाच्या बातम्या