कॉमेडियन प्रणित मोरेच्या स्टँड-अप शोममधील वक्तव्य डाॅ. सेजल पवारला भाेवणार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कॉमेडियन प्रणित मोरे याच्या स्टँड-अप शोममध्ये मृतदेहाच्या गुप्तांगाबाबत वक्तव्य करणे डाॅ. सेजल पवार हिला चांगलेच भाेवले आहे. पाेलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यावर केइएम रुग्णालयानेही चाैकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. Praneet More

प्रणित माेरेच्या शाेमध्ये एका तरुणाने तरुणीसाेबत डेटींगबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले हाेते. डेटवर आलेल्या एका तरुणीला ३७० रुपयांची बिर्याणी खाऊ घातली. त्यानंतर हे पैसे वसुल करण्यासाठी उद्यानात नेले असे वक्तव्य त्याने केले हाेते. त्याच शोमधील आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे सेजल पवार. स्वतःला अंतिम वर्षाची एमबीबीएस विद्यार्थिनी म्हणून ओळख करून देणाऱ्या सेजलने शोदरम्यान शवविच्छेदन प्रशिक्षणाबाबत केलेल्या काही वक्तव्यांवरून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये सेजल पवार मेडिकल कॉलेजमधील डिसेक्शन रूममधील अनुभव सांगताना दिसते. संवादादरम्यान तिने काही विद्यार्थी मृतदेहांच्या गुप्तांगांच्या आकारावरून विनोद किंवा टिप्पणी करत असल्याचा उल्लेख केला. शरीरदान केलेल्या मृतदेहांबाबत अशा प्रकारे बोलल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे.



वैद्यकीय शिक्षणासाठी शरीरदान करणाऱ्या व्यक्तींबद्दल अत्यंत आदर आणि संवेदनशीलतेने वागणे अपेक्षित असताना अशा प्रकारची भाषा वापरणे अयोग्य असल्याचे अनेकांनी म्हटले. काही डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी आणि सामाजिक माध्यमांवरील वापरकर्त्यांनीही या वक्तव्याचा निषेध केला.

वाद वाढल्यानंतर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD) च्या KEM शाखेने अधिकृत निवेदन जारी केले. या निवेदनात सेजल पवार ही संघटनेची सदस्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर व्हायरल क्लिपमध्ये दिसणारी वक्तव्ये वैद्यकीय व्यवसायाच्या प्रतिष्ठेला आणि नैतिक मूल्यांना साजेशी नसल्याचेही संघटनेने नमूद केले. डॉक्टर म्हणून अपेक्षित असलेल्या संवेदनशीलतेशी ही वक्तव्ये विसंगत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

वाद वाढताच सेजल पवारने सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध करून माफी मागितली. व्हायरल होत असलेली क्लिप पुन्हा पाहिल्यानंतर लोक का नाराज झाले आहेत, हे आता समजल्याचे तिने म्हटले. हा अत्यंत संवेदनशील विषय असून आपण ज्या पद्धतीने बोललो, तसे बोलायला नको होते, अशी कबुलीही तिने दिली. आपल्या वक्तव्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारत कोणाचाही अनादर करण्याचा हेतू नव्हता, असे तिने स्पष्ट केले. मात्र आपल्या बोलण्यामुळे काहींच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत भविष्यात अशा विषयांवर अधिक जबाबदारीने बोलण्याचे आश्वासन दिले.

सेजल पवारचे इन्स्टाग्राम अकाउंटही उपलब्ध नसल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले. सोशल मीडियावर तिचे अकाउंट डिलीट किंवा डीॲक्टिव्हेट करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Comedian Praneet More’s statement in his stand-up show will make Dr. Sejal Pawar angry

महत्वाच्या बातम्या