ठाकरे गटाबाबत जे घडले ते पाहून आत्मा हादरला, अंजली दमानिया यांचा संताप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : उद्धव ठाकरे गटाच्या समर्थक नाही. मात्र, तरीही जे घडले त्यामुळे मन अस्वस्थ झाले आहे. आत्मा हादरला आहे. मी लोकशाहीच्या बाजूने आहे. लाेकशाही टिकवायची असेल तर विराेधी पक्षही बळकट पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केले. Anjali Damania

अंजली दमानिया म्हणाल्या की, मी ठाकरे गटाची अजिबात समर्थक नाही. मी लोकशाही समर्थक आहे. मी ठाकरे गटाविरोधात टोकाचे लढे दिले आहेत. पण आज जे घडत आहे, ते पाहवत नाही.

त्यांनी संबंधित खासदारांच्या निवडणुकीतील विजयाची आठवण करून देत दमानिया म्हणाल्या की, या खासदारांनी शिंदे गटाच्या उमेदवारांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला होता. संजय देशमुख यांनी शिंदे गटाचे हेमंत पाटील यांचा पराभव केला. भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांना हरवले. नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदे गटाचे उमेदवार भाऊराव कदम यांच्यावर विजय मिळवला. याचा स्पष्ट अर्थ मतदारांनी त्यावेळी शिंदे गटाला नाकारले होते. मग आता निवडून आल्यानंतर त्याच गटात जाणे ही मतदारांची प्रतारणा नाही का? हा विश्वासघात नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.



दमानिया यांनी मतदारांच्या निर्णयामागील व्यापक संदर्भ मांडताना म्हटले की, मतदार केवळ व्यक्तीला मतदान करत नाही, तर तो एका पक्षाच्या चिन्हाला, विचारधारेला आणि उमेदवारावरील विश्वासालाही मतदान करतो. मतदारांनी एका चिन्हाला, एका विचारधारेला आणि खासदारांवरील विश्वासाला मत दिले होते. आजच्या फोडाफोडीच्या राजकारणात केवळ खासदार विकले जात नाहीत, तर मतदारांचा विश्वास विकला जात आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी केलेल्या हालचालींना लोकसभा स्तरावर मान्यता मिळाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासंदर्भातील अर्ज मंगळवारीच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर केला होता.

What Happened to the Thackeray Camp Shook My Soul”: Anjali Damania Expresses Anguish

 

महत्वाच्या बातम्या