विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाम शब्दांत फेटाळून लावत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. “तीस वर्षे भाजपसोबत राहूनही आम्ही भाजपमध्ये विलीन झालो नाही, मग काँग्रेसमध्ये कसे विलीन होणार? उलट महाराष्ट्र भाजपच आता ‘मिंधेसेनेत’ विलीन होईल, अशी भीती वाटते,” असा टोला मारला.Uddhav Thackeray
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित हिरक महोत्सवी मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी भाजप, शिंदे गट, बंडखोर खासदार आणि वैयक्तिक टीका करणाऱ्यांवर कडाडून प्रहार केला.Uddhav Thackeray
काँग्रेससोबत राजकीय मतभेद असले तरी त्यांनी कधीही ‘मातोश्री’वर हल्ला केला नाही, मात्र भाजपने शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीका करताना, “तुम्हाला राजकारणात पोरं होत नाहीत म्हणून आमची पोरं का पळवताय?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.Uddhav Thackeray
ठाकरे कुटुंबावर होत असलेल्या वैयक्तिक टीकेवर संताप व्यक्त करताना त्यांनी ‘मातोश्री’वर शिंतोडे उडवणाऱ्यांवर निशाणा साधला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसात रुजवलेला स्वाभिमान काही जण विसरत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
देशातील सुरक्षा यंत्रणांचा राजकीय हेतूंसाठी वापर होत असल्याचा आरोप करत ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. “पक्ष फोडण्यासाठी सुरक्षा दलांचा वापर केला जातो, मग हेच बळ मणिपूर किंवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये का वापरले जात नाही?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
‘ऑपरेशन कमळ’वर निशाणा साधताना ठाकरे म्हणाले, “आजकाल चोरी पकडली की तिला ऑपरेशन म्हणतात. देशाला वाचवण्यासाठी आता आपल्यालाच ‘ऑपरेशन कमळ’ करावे लागेल.” तसेच ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या संकल्पनेवर टीका करत त्यांनी सत्ताधाऱ्यांची वाटचाल ‘वन पार्टी, नो इलेक्शन’कडे सुरू असल्याचा आरोप केला.
शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या संदर्भात सरकारवर टीका करताना त्यांनी म्हटले की, शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अनेक अटी घातल्या जातात, मात्र आमदार-खासदारांची खरेदी करताना कोणत्याही अटी नसतात. शेतमालाला हमीभाव नसला तरी आमदार-खासदारांचा हमीभाव निश्चित असल्याचा टोला त्यांनी लगावला.
पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर बोलताना ठाकरे यांनी स्पष्ट केले की, काही खासदारांच्या निर्णयामुळे पक्षाचे विलीनीकरण होत नाही. पक्षप्रमुखाचा निर्णय अंतिम असतो आणि दहाव्या अनुसूचीनुसार पक्ष सोडणाऱ्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
भावनिक होत ठाकरे म्हणाले, “शिवसैनिक माझ्यासोबत असतील तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला घाबरणार नाही. मात्र माझ्यावरील आरोप खरे वाटत असतील तर मला नेतृत्वाची हाव नाही, मी आत्ताच पायउतार व्हायला तयार आहे.”
BJP will merge into ‘Mindhe Sena’, not us into Congress: Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Shinde Sena : मुंबई महापालिकेत ‘ऑपरेशन टायगर’? ठाकरे गटातील 25 नगरसेवक संपर्कात असल्याचा शिंदे सेनेचा दावा
- Deepak Sawant : मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला झटका, दीपक सावंत यांचे जात प्रमाणपत्र अवैध
- Sanjay Raut : मानहानीच्या खटल्यात संजय राऊत यांच्या निर्दोषमुक्तीला मेधा सोमैया यांचे हायकोर्टात आव्हान
- BEST Employees’ : न्यायालयाच्या आदेशानंतरही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप