विशेष प्रतिनिधी
धाराशिव: Omaraje खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यात ओमराजेंनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. तसेच मी जो निर्णय घेत आहे तो सर्वांना मान्य असावा, असे आवाहन त्यांनी केले.Omaraje
ओमराजे निंबाळकर म्हणाले, निकाल विरोधात गेल्यानंतर ताबडतोब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली. आता त्यामुळे आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. मला बरेच कार्यकर्ते म्हणाले की नाव खराब होत आहे. काही लोक म्हणत होते की निकाल लावण्यासाठी गेला होता. आपल्याला अनेक कामांमध्ये देखील अडचणी येत आहेत. त्यामुळे मी जो काही निर्णय घेणार आहे, त्यात तुम्ही माझ्या पाठीशी राहावे असे मला वाटते. खूप लोकांचे फोन आले. शेवटी आपल्याला सुद्धा जीवंत राहणे गरजेचे आहे.Omaraje
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी ओमराजे यांच्यावर जाहीर टीका केली असली, तरी पडद्यामागे मात्र त्यांची मनधरणी करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील हे मध्यरात्री अत्यंत गुप्तपणे ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले.
ठाकरे गटाची ही रणनीती अत्यंत महत्त्वाची आहे. जर ओमराजे निंबाळकर यांचे बंड शांत करण्यात ठाकरे गटाला यश आले, तर दिल्लीत असलेल्या उर्वरित ५ बंडखोर खासदारांचे गणित बिघडू शकते आणि त्यांचा गट धोक्यात येऊ शकतो. म्हणूनच ठाकरे गटाकडून ओमराजेंना थांबवण्यासाठी संपूर्ण ताकद लावली जात आहे.
प्रकरणाचा निकाल ओमदादांच्या अपेक्षेप्रमाणे लागलेला नाही. त्यामुळे खचलेल्या निंबाळकर परिवाराची विचारपूस करण्यासाठी पक्षाच्या वतीने आम्ही आलो होतो. ओमदादा हे आमच्या पक्षाकडून एकदा आमदार आणि तीनदा खासदार झाले आहेत. आजही ते ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले खासदार आहेत. आमच्यात अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली, मात्र प्रत्येक गोष्ट माध्यमांसमोर सांगण्याची गरज नसते.
Omaraje’s move confirmed, set to join Eknath Shinde-led Shiv Sena
महत्वाच्या बातम्या