Mumbai Police : मुंबईतील ११ ऑर्केस्ट्रा बारचे परवाने ३० दिवसांसाठी निलंबित; अश्लील हावभाव व नियमभंगावर कठोर कारवाई

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Mumbai Police  मुंबई पोलिसांनी नियम व परवाना अटींचे उल्लंघन करणाऱ्या ११ ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई करत त्यांचे परवाने ३० दिवसांसाठी निलंबित केले आहेत.Mumbai Police

कारवाई करण्यात आलेल्या बारमध्ये सेनोरिटा, सफायर, सनशाईन पंजाब, राज पॅलेस व ब्ल्यू डायमंड (डॉ. दा. भ. मार्ग पोलीस ठाणे), कमांडो, उर्वशी व साई प्रसाद (अंधेरी पोलीस ठाणे), विलास लंच होम (अंबोली पोलीस ठाणे), चिरंजीवी (दहिसर पोलीस ठाणे) आणि स्वागतम् (मालाड पोलीस ठाणे) यांचा समावेश आहे.Mumbai Police



पोलिसांच्या तपासादरम्यान या ऑर्केस्ट्रा बारमधील बारबालांकडून अश्लील हावभाव करण्यात येत असल्याचे तसेच ग्राहकांशी लगट केली जात असल्याचे आढळून आले. याशिवाय परवाना अटींचा गैररित्या भंग व उल्लंघन करण्यात येत असल्याचेही निदर्शनास आले.

या सर्व बाबींचा विचार करून संबंधित ११ ऑर्केस्ट्रा बारचे परवाने ३० दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहेत. समाजामध्ये अशा अश्लील प्रकारांना थारा दिला जाणार नसून, यापुढेही नियम व परवाना अटींचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

Mumbai Police Suspend Licences of 11 Orchestra Bars for 30 Days Over Obscene Acts and Rule Violations

महत्वाच्या बातम्या