Sakinaka Manhole : साकीनाका मॅनहोल मृत्यू प्रकरणात कंत्राटदार फरार: 3 मजुरांनाच पोलिसांनी घेतले ताब्यात, मुंबईतील 16 हजारांहून अधिक मॅनहोलची तपासणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई ; Sakinaka Manhole अंधेरीतील साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून 55 वर्षीय अस्लम शेख यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. या प्रकरणात कंत्राटदारासह संबंधित कामगारांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळी काम करणाऱ्या तीन मजुरांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य कंत्राटदार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसून त्याचा शोध सुरू आहे.Sakinaka Manhole

अंधेरीतील साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून 55 वर्षीय अस्लम शेख यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. या प्रकरणात कंत्राटदारासह संबंधित कामगारांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळी काम करणाऱ्या तीन मजुरांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य कंत्राटदार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेनेही संपूर्ण शहरातील मॅनहोलची तपासणी मोहीम हाती घेतली असून, अवघ्या दोन दिवसांत 16 हजारांहून अधिक मॅनहोलची पाहणी करण्यात आली आहे.Sakinaka Manhole



गुरुवारी साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी मुंबई महापालिकेच्या एल विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार कंत्राटदार आणि घटनास्थळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत सदोष मनुष्यवधासह संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळी काम करणाऱ्या तीन मजुरांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून कंत्राटदाराची माहिती आणि कामकाजाबाबत चौकशी सुरू आहे. पोलिसांनी कंत्राटदाराचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके तयार केली असून, तो अद्याप फरार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित ठिकाणी काम करण्यासाठी अधिकृत ‘वर्क ऑर्डर’ देण्यात आली होती की नाही, याचीही चौकशी सुरू आहे. काही अधिकाऱ्यांच्य माहितीनुसार, त्या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता नव्हती आणि अधिकृत परवानगीशिवाय काम सुरू झाले होते का, याचाही तपास केला जात आहे. यासंदर्भात महापालिकेच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडूनही माहिती मागवण्यात आली आहे.

साकीनाका दुर्घटनेपूर्वी चेंबूरमध्ये झाड कोसळून शाळेच्या व्हॅनमधील 10 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने मुंबई महापालिकेच्या पावसाळी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या दोन्ही घटनांनंतर महापालिकेने स्वतंत्र चौकशी सुरू केली असून, विविध सुरक्षा उपाययोजनांचाही आढावा घेतला जात आहे.

साकीनाका दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने शहरातील सर्व मॅनहोलची विशेष तपासणी सुरू केली आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, मुंबईत एकूण 1 लाख 3 हजार 926 मॅनहोल आहेत. त्यापैकी 4 हजार 446 मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम सुरू आहे. गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत 16 हजार 623 मॅनहोलची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित मॅनहोलचीही टप्प्याटप्प्याने तपासणी केली जाणार असून, आवश्यक त्या ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

Sakinaka Manhole Death Case: Contractor Absconding, Three Workers Detained; Mumbai Inspects Over 16,000 Manholes

महत्वाच्या बातम्या