विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mumbai Rainfall बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आतापर्यंत ५८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस जुलै महिन्याच्या सरासरीच्या ७४ टक्के इतका आहे. तर, मागील २४ तासांत शहर आणि उपनगरांमध्ये २५० ते ३०० मिलीमीटर पाऊस झाला. समुद्राला ४.२६ मीटर उंचीची मोठी भरती आणि मुसळधार पाऊस असूनही मुंबईतील जनजीवन सुरळीत राहिल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली.Mumbai Rainfall
महापालिकेच्या माहितीनुसार, मुंबई उपनगरातील विक्रोळी येथे मागील २४ तासांत सर्वाधिक ३१६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ही यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक नोंद मानली जात आहे. मुंबईत वर्षभरात सरासरी २,३१८ मिलीमीटर, तर जुलै महिन्यात सुमारे ८०० मिलीमीटर पाऊस पडतो. त्यापैकी अवघ्या चार दिवसांतच ५८८ मिलीमीटर पाऊस झाला आहे.Mumbai Rainfall
मुसळधार पावसादरम्यान शहरातील सुमारे १० सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. महापालिकेच्या पथकांनी तातडीने उपाययोजना करून पाण्याचा निचरा केला. तसेच झाडे व फांद्या पडण्याच्या १०३ तक्रारी, त्यापैकी १८ झाडे पडल्याच्या, तसेच १७ घरे किंवा भिंती कोसळल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, भांडूप (पश्चिम) येथील लाल बहादूर शास्त्री मार्गालगत एका खासगी विकासकाच्या बांधकामस्थळी खोदकामाचा भाग कोसळल्याची घटना घडली. या ठिकाणी महापालिकेने तातडीने बॅरिकेडिंग करून सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत.
महापालिकेचे सुमारे १० हजार अधिकारी आणि कर्मचारी विविध विभागांमध्ये प्रत्यक्ष मैदानात कार्यरत असून वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. महापालिकेने नागरिकांना आवश्यक तेवढेच घराबाहेर पडण्याचे आणि हवामान विभाग तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
Mumbai Receives 74% of July’s Average Rainfall in Just Four Days; Life Remains Unaffected
महत्वाच्या बातम्या