विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत प्रथमच अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. विमान अपघात तपास यंत्रणेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दुर्घटनेनंतर विमानातील दोन्ही नोंदणी साधनांवर तीव्र आगीचा परिणाम झाल्याने तपासात अडचणी असल्याचे म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळावर अपघात झाला हाेता. यावेळी माेठा स्फाेट झाला हाेता. या अपघाताबाबत काही घटकांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत विमान अपघात तपास यंत्रणेने म्हटले आह की विमानातील नाेंदणी साधने बराच काळ ज्वाळांमध्ये राहिल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तपास प्रक्रियेला काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. तर्कवितर्कांना बळी न पडता अधिकृत तपासावर विश्वास ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. ajit pawar
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, विमानात दोन स्वतंत्र नोंदणी साधने होती. त्यापैकी एकातील एल-3 संभाषणाशी संबंधित माहिती यशस्वीरित्या प्राप्त करण्यात आली आहे. मात्र कॉकपीटमधील संभाषण नोंदवणाऱ्या साधनावर सखोल तांत्रिक परीक्षण सुरू आहे. हे उपकरण हनीवेल कंपनीनिर्मित असल्याने संबंधित देशातील अधिकृत प्रतिनिधींची मदत मागविण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार, पुराव्यावर आधारित तपास करण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तपास प्रक्रियेबाबत चुकीची माहिती पसरवू नये, असे आवाहन यंत्रणेने केले आहे. ajit pawar
विमान दुर्घटनेनंतर सर्वप्रथम शोधले जाणारे साधन म्हणजे ब्लॅक बॉक्स. प्रत्यक्षात त्याचा रंग नारंगी असतो आणि तो दोन भागांमध्ये विभागलेला असतो. एक भाग उड्डाणाशी संबंधित तांत्रिक माहिती साठवतो, तर दुसरा भाग कॉकपीटमधील संभाषण नोंदवतो. या साधनावर आग किंवा पाण्याचा सहसा परिणाम होत नाही, अशी रचना असते. त्यातील बॅटरी सुमारे तीस दिवस कार्यरत राहते आणि त्यातील माहिती अनेक वर्षांनंतरही वापरता येते. त्यामुळे कोणत्याही विमान दुर्घटनेत हे साधन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ajit pawar
विमान दुर्घटना घडल्यानंतर विशेष प्रशिक्षण घेतलेली तपास पथके घटनास्थळी दाखल होतात. विमान वाहतूक महासंचालनालय आणि विमान दुर्घटना तपास यंत्रणा यांच्या माध्यमातून या पथकांची नियुक्ती केली जाते. अनेकदा नौदल किंवा विशेष बचाव पथकांचाही या शोधमोहीमेत सहभाग असतो. दुर्घटनेमागील नेमकी कारणे शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्समधील माहिती अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे या साधनांच्या स्थितीबाबत आलेली माहिती तपासासाठी निर्णायक मानली जात आहे. ajit pawar
तपास यंत्रणेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, आंतरराष्ट्रीय निकषांनुसार आणि पुराव्यावर आधारित पद्धतीनेच संपूर्ण तपास केला जात आहे. नुकसानग्रस्त नोंदणी साधनांमधून शक्य तितकी माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. संबंधित तज्ज्ञांची मदत घेऊन तांत्रिक परीक्षण पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. चुकीच्या अफवा पसरवू नयेत आणि अधिकृत अहवालाची प्रतीक्षा करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.