Cockroach Janata Party : “अभिजीतने ही चळवळ थांबवावी”, कॉकरोच जनता पार्टीच्या संस्थापकाच्या आई-वडिलांची भावनिक प्रतिक्रिया

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : Cockroach Janata Party सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके याच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. अभिजीतच्या आई अनिता दीपके आणि वडील भगवान दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुलाने राजकारणापासून दूर राहावे आणि सुरू केलेली चळवळ थांबवावी, अशी भावनिक विनंती केली.Cockroach Janata Party

“अभिजीतचे फॉलोअर्स वाढत आहेत, लोक त्याच्याबद्दल बोलत आहेत, पण आम्हाला त्याची भीती वाटते. प्रसिद्धीपेक्षा त्याच्या सुरक्षिततेची जास्त चिंता आहे,” असे अनिता दीपके यांनी सांगितले. “दोन दिवस मला झोप लागली नाही. उचलून नेतात, अटक करतात, अशा बातम्या सतत पाहतो. आपल्याला या सगळ्याची सवय नाही,” असेही त्या म्हणाल्या.Cockroach Janata Party



अभिजीतच्या बालपणाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, तो लहानपणापासून शांत आणि अभ्यासू स्वभावाचा होता. त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण अल्फान्सो स्कूलमध्ये झाले, तर अकरावी-बारावीचे शिक्षण एसबी कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर त्याने पुण्यात मास मीडियाचे शिक्षण घेतले. वडील भगवान दीपके यांनी सांगितले की, पत्रकारितेत पुढील शिक्षण घेण्यासाठी अभिजीत परदेशात गेला होता.Cockroach Janata Party

“आमच्या मुलाने पार्टी सुरू केल्याचे आम्हाला 17 मे रोजी समजले. ‘कॉकरोच जनता पार्टी’ हे नाव ऐकून आम्हालाच धक्का बसला. मी त्याला विचारलं, ‘हे झुरळ-झुरळ काय सुरू आहे?’,” असे अनिता दीपके यांनी हसत सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की, “माझ्या नातवाने तर सांगितलं की अभिजीतचे फॉलोअर्स भाजपपेक्षाही जास्त झाले आहेत.”

भगवान दीपके यांनी स्पष्टपणे सांगितले की, “राजकारण हा आमचा पिंड नाही. माझी इच्छा होती की अभिजीतने क्लास वन अधिकारी व्हावं. आम्ही कधी राजकारणात पडलो नाही आणि त्याची आवडही नाही.” त्यांनी अभिजीतने काही वर्षे मीडिया क्षेत्रात काम केल्याचेही सांगितले. “मास मीडियाचे शिक्षण घेतल्यानंतर त्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या टीमकडूनही बोलावणे आले होते. पण आम्ही त्याला सांगितले होते की, चांगली नोकरी आणि सेवा हाच योग्य मार्ग आहे,” असे अनिता दीपके म्हणाल्या.

दरम्यान, अभिजीत दीपकेच्या वाढत्या प्रसिद्धीमुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “आजच्या राजकारणात कोणाला कधी अटक होईल किंवा काय होईल सांगता येत नाही. संजय राऊत आणि संजय सिंह यांच्याबाबत जे घडलं ते पाहून भीती वाटते,” असे भगवान दीपके म्हणाले. “अभिजीतने एका मुलाखतीत भारतात आलो तर तुरुंगात टाकतील असे म्हटले होते. हे ऐकून आम्ही अधिकच चिंतेत पडलो,” असेही त्यांनी सांगितले.

“तो प्रामाणिक मुलगा आहे. पुढे काय करायचं हा निर्णय त्याचा आहे. पण आमची इच्छा एवढीच आहे की त्याने राजकारणात जाऊ नये,” असे भगवान दीपके यांनी स्पष्ट केले. तर अनिता दीपके यांनी भावनिक शब्दांत, “अभिजीत जे काही करतोय, ते त्याने आता थांबवावं,” असे आवाहन केले.

“Abhijit should stay away from politics”, Cockroach Janata Party founder’s parents express fear over rising fame

महत्वाच्या बातम्या