पुण्यातील आणखी एक प्राध्यापिका नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयच्या जाळ्यात, मनीषा हवालदार यांना अटक

विशेष प्रतिनिधी

पुणे : नीट परीक्षेच्या फिजिक्स प्रश्नपत्रिका लीक प्रकरणात सीबीआयने आणखी एका मुख्य आरोपीला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असे त्यांचे नाव असून त्या पुण्यातील सेठ हिरालाल सराफ प्रशाला येथे कार्यरत आहेत. त्यांना सखोल चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे.

मनीषा हवालदार या नीट युजी 2026 परीक्षा प्रक्रियेत एन टी ए कडून एक्सपर्ट म्हणून नियुक्त करण्यात आल्या होत्या. एप्रिल 2026 दरम्यान त्यांनी फिजिक्स विषयातील काही प्रश्न सहआरोपी मनीषा मांढरे हिला शेअर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. विशेष म्हणजे त्यांनी शेअर केलेले प्रश्न नीट युजी2026 च्या फिजिक्स पेपरशी जुळत असल्याचे सीबीआय तपासात समोर आले आहे.

या प्रकरणात सीबीआयने देशभरातील विविध ठिकाणी छापेमारी करत अनेक महत्त्वाचे दस्तावेज, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. जप्त साहित्याची सखोल तपासणी सध्या सुरू आहे.

दरम्यान, 12 मे 2026 रोजी शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्या तक्रारीनंतर सीबीआयने हा गुन्हा दाखल केला होता. आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर येथून एकूण 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Another Pune professor held in NEET paper leak case; CBI arrests Manisha Havaldar

महत्वाच्या बातम्या