विशेष प्रतिनिधी
अमरावती: विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाहीये, अशातच भाजपाकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे.अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी मंत्री प्रवीण पोटे यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
माजी मंत्री प्रवीण पोटे हे अमरावती स्थानिक मतदारसंघातून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती मध्ये अर्ज दाखल करणार आहेत.मात्र भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या या उमेदवारीमुळे महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
राणा दाम्पत्याला धक्का..
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी भाजपाच्या स्थानिक नेत्यांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत होता.प्रवीण पोटे यांच्या नावाची चर्चा सुरू असताना राणा दाम्पत्याने त्याचं उमेदवारीला विरोध केला होता.माजी खासदार नवनीत राणा यांनी पोटेंच्या नावाला विरोध करून, भाजपाचे शहराध्यक्ष डॉ.नितीन धांडे यांच्या नावाला संमती दिली होती. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रवीण पोटे यांनी आपला प्रचार केला नसल्याचा आरोप नवनीत राणा आणि रवी राणा यांनी केला होता.मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रवीण पोटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.त्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
शुक्रवारी प्रवीण पोटे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित असणार आहेत.
BJP plays a big trick in Amravati; Praveen Pote’s name confirmed
महत्वाच्या बातम्या