विशेष प्रतिनिधी
बारामती : शेतकरी अतिशय बिकट परिस्थितीत आहे, त्याला आधार देणे हे सरकारचे नैतिक कर्तव्य आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे शेतजमिनी अक्षरशः वाहून गेल्या आहेत. नुकसान भरपाई देऊन आर्थिक मदत करता येईल, पण जमीनच नसलेल्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन कसे करायचे, हा एक मोठा ‘यक्षप्रश्न’ आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. Sharad Pawar
बारामतीत पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, पवार म्हणाले, शेतकरी अतिशय बिकट परिस्थितीत आहे, त्याला आधार देणे हे सरकारचे नैतिक कर्तव्य आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे शेतजमिनी अक्षरशः वाहून गेल्या आहेत. नुकसान भरपाई देऊन आर्थिक मदत करता येईल, पण जमीनच नसलेल्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन कसे करायचे, हा एक मोठा ‘यक्षप्रश्न’ आहे.
अशा प्रकारचे नुकसान महाराष्ट्रात यापूर्वी कधीही झाले नव्हते. त्यामुळे फक्त सर्वेक्षण करून थांबणे उपयोगाचे नाही, तर प्रत्यक्ष आर्थिक आणि भौतिक मदतीची गरज असल्याचे सांगत शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांची भेट घेऊन परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे शरद पवार यांनी सांगितले. तसेच सुप्रिया सुळे यांनी केंद्राकडून अधिक मदत मिळावी, अशी मागणी केली असून, त्यांच्याकडून लवकरात लवकर निर्णय होतील या संकटग्रस्तांना उभे करण्यासाठी सरकार हातभार लावेल.
सरकारने संवेदनशीलता दाखवत संकटग्रस्त शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी त्वरित पावले उचलली पाहिजेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली असून, अनेक ठिकाणी रस्ते आणि सिंचन व्यवस्था कोसळल्याने नुकसान वाढले आहे.
How will landless farmers be rehabilitated? Sharad Pawar questions the government
महत्वाच्या बातम्या
- Ravindra Dhangekar चंद्रकांतदादा गुन्हेगारांना पाठीशी का घालतात, रवींद्र धंगेकरांचा थेट सवाल
- Uddhav Thackeray : मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? आत्मचिंतन करा : एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
- Congress : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर आंदोलन करणार
- Ajit Pawar : अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, तासभर चर्चा झाल्याने राजकीय खळबळ