विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील सर्व राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला वेगाने कामाला लागले आहे. या पार्श्वभूमिवर राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत सोमवारी जाहीर करण्यात आली.
मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची सोडत काढण्यात आली. यावेळी 33 नगरपरिषदांपैकी 16 नगरपरिषदांसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाले आहे. ही निवडणूक मिनी विधानसभा निवडणूक मानली जाते. या आरक्षणाच्या निमित्ताने नगरपरिषदांमध्ये महिलाराज येणार आहे. या सोडतीला विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारीदेखील उपस्थित होते.
33 पैकी 16 नगरपरिषदांसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर
देऊळगावराजा : महिला प्रवर्ग आरक्षित
मोहोळ : महिला प्रवर्ग आरक्षित
तेल्हारा : महिला प्रवर्ग आरक्षित
ओझर : महिला प्रवर्ग आरक्षित
वानाडोंगरी : महिला प्रवर्ग आरक्षित
भुसावळ : महिला प्रवर्ग आरक्षित
घुग्गूस : महिला प्रवर्ग आरक्षित
चिमूर : महिला प्रवर्ग आरक्षित
शिर्डी : महिला प्रवर्ग आरक्षित
सावदा : महिला प्रवर्ग आरक्षित
मैनदर्गी : महिला प्रवर्ग आरक्षित
दिगडोहदेवी : महिला प्रवर्ग आरक्षित
दिग्रस : महिला प्रवर्ग आरक्षित
अकलूज : महिला प्रवर्ग आरक्षित
बीड : महिला प्रवर्ग आरक्षित
शिरोळ : महिला प्रवर्ग आरक्षित
अनुसूचित जमातीमध्ये प्रवर्गात महिला आरक्षण
भडगाव (जळगाव)
वणी
पिंपळनेर (धुळे)
उमरी (नांदेड)
यवतमाळ
शेंदूरजनघाट
67 नगरपरिषदपैकी 34 ओबीसी महिलांसाठी आरक्षित
भगूर – ओबीसी महिला
इगतपुरी – ओबीसी महिला
विटा – ओबीसी महिला
बल्हारपूर – ओबीसी महिला
धाराशिव – ओबीसी महिला
भोकरदन – ओबीसी महिला
जुन्नर – ओबीसी महिला
उमरेड – ओबीसी महिला
दौडं – ओबीसी महिला
कुळगाव बदलापूर – ओबीसी महिला
हिंगोली – ओबीसी महिला
फुलगाव – ओबीसी महिला
मुरुड जंजिरा – ओबीसी महिला
शिरूर – ओबीसी महिला
काटोल – ओबीसी महिला
माजलगाव – ओबीसी महिला
मूल – ओबीसी महिला
मालवण – ओबीसी महिला
देसाईगंज – ओबीसी महिला
हिवरखेड – ओबीसी महिला
अकोट – ओबीसी महिला
मोर्शी – ओबीसी महिला
नेर- नवाबपूर – ओबीसी महिला
औसा – ओबीसी महिला
कर्जत – ओबीसी महिला
देगलूर – ओबीसी महिला
चोपडा – ओबीसी महिला
सटाणा- ओबीसी महिला
दोंडाईचा वरवडे – ओबीसी महिला
बाळापूर – ओबीसी महिला
रोहा – ओबीसी महिला
कुरडुवादी – ओबीसी महिला
धामणगावरेल्वे – ओबीसी महिला
वरोरा – ओबीसी महिला
Lottery announced for the post of mayor of municipalities and municipal councils
महत्वाच्या बातम्या
- Ravindra Dhangekar चंद्रकांतदादा गुन्हेगारांना पाठीशी का घालतात, रवींद्र धंगेकरांचा थेट सवाल
- Uddhav Thackeray : मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? आत्मचिंतन करा : एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
- Congress : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर आंदोलन करणार