विशेष प्रतिनिधी
पुणे: भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत.राज्यात समन्वयक, संयोजक आणि सहसंयोजकांच्या नव्याने नियुक्त जाहीर केल्या आहेत.५ मे रोजी नवीन कार्यकारणीचा निर्णय लागू करण्यात आला आहे.
पुढील काळात पक्षाचे समन्वय आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी धुरा नवीन कार्यकर्त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
कुठली जबाबदारी कुणावर?
राजेश पांडे यांची मुंबई विभागासाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण आणि ठाणे विभागाची जबाबदारी योगेश सागर तर प्रमोद जठार यांना संयोजक आणि संजय वाघोळे यांना सहसंयोजक पदाची धुरा देण्यात आली आहे.
निरंजन डावखरे यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक पद, विक्रम पावसकर संयोजक आणि विक्रम देशमुख सहसंयोजक म्हणून काम पाहणार आहेत. विधान परिषदेवर संधी मिळालेल्या माधवी नाईक या उत्तर महाराष्ट्रातील समन्वयकपदी तर, विजय चौधरी संयोजक आणि मंगेश चव्हाण सहसंयोजक असतील.
सुनील राणे मराठवाडा विभागाचे समन्वयक, नितीन काळे संयोजक आणि राहुल लोणीकर हे सहसंयोजक पदी नियुक्त करण्यात आले आहेत. विदर्भाच्या समन्वयक पदी संजय कुंटे, संयोजकपदी दिनेश सुर्वे आणि सहसंयोजक पदी प्रवीण भटके यांची निवड करण्यात आली आहे.
आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी या नियुक्त्या करण्यात असल्याचे सांगितले जात आहे.
Major BJP Reshuffle Ahead of Upcoming Elections
महत्वाच्या बातम्या
- ‘मला खोटं गोवलं’ आरोपीचा दावा फेटाळला; नसरापूर प्रकरणात तपास अधिक तीव्र
- पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा ३१ मेपर्यंत सुरू होण्याची शक्यता…
- विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार, अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद
- टीसीएस बीपीओ प्रकरण: निदा खानचा अटकपूर्व जामीन फेटाळला, अटकेची टांगती तलवार