Fadnavis : ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’; मोदी सरकार कोसळणार म्हणणाऱ्या राहुल गांधींना मुख्यमंत्र्यांचा टोला

विशेष प्रतिनिधी

नागपूर : Fadnavis  लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशातील आर्थिक असंतोषामुळे पुढील वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार कोसळेल, असा दावा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. “हे म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ यापेक्षा वेगळे काही नाही,” असा टोला फडणवीस यांनी लगावला.Fadnavis

\नागपूरजवळील गोंडखैरी येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक लॉजिस्टिक पार्कच्या उद्घाटनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राहुल गांधींच्या विधानावर प्रतिक्रिया दिली.
काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी देशातील आर्थिक आव्हाने, वाढती बेरोजगारी आणि जनतेतील असंतोष यामुळे आगामी काळात केंद्र सरकारवर परिणाम होईल आणि पुढील एका वर्षात मोदी सरकार कोसळेल, असा दावा केला होता.Fadnavis



यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, देशात पायाभूत सुविधा आणि उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग, वाढवण बंदर, लॉजिस्टिक पार्क आणि औद्योगिक कॉरिडॉरमुळे रोजगारनिर्मिती आणि गुंतवणुकीच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत.

यावेळी त्यांनी विदर्भातील औद्योगिक विकासावर विशेष भर दिला. समृद्धी महामार्गाच्या अतिरिक्त कामांना वेग देण्यात आला असून त्यामुळ े संपूर्ण विदर्भ औद्योगिकदृष्ट्या प्रगत होईल. मालवाहतूक क्षेत्रातील खर्च कमी होऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

फडणवीस म्हणाले की, पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळ उभारण्यात येत असलेले वाढवण बंदर हे देशातील सर्वात मोठे बंदर ठरणार असून त्याचे पहिले टर्मिनल २०२९ च्या सुरुवातीला सुरू होण्याची अपेक्षा आहे. जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये वाढवणचा समावेश होईल, असा दावाही त्यांनी केला.

या बंदरामुळे उत्पादन, पुरवठा आणि लॉजिस्टिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येईल. नागपूरहून थेट वाढवण बंदरापर्यंत संपर्क साधण्यासाठी समृद्धी महामार्गावरून विशेष मार्ग विकसित करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आज जागतिक राजकीय परिस्थितीमुळे उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रात नवीन संधी निर्माण होत असल्या तरी मालवाहतुकीच्या वाढत्या खर्चाचे मोठे आव्हान असल्याचे फडणवीस म्हणाले. जागतिक स्तरावर स्पर्धा करायची असेल तर लॉजिस्टिक खर्च कमी करणे आवश्यक आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम गतिशक्ती योजनेअंतर्गत रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरे आणि जलमार्ग यांचे एकत्रित नियोजन केले असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्य सरकारनेही नवीन लॉजिस्टिक धोरण आणले असून मुंबईनंतर नागपूरला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यामुळे नागपूर, नाशिक आणि गडचिरोलीसारखी शहरे आता नवीन औद्योगिक हब बनत असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपुरात सुरू झालेले अत्याधुनिक लॉजिस्टिक पार्क भविष्यातील औद्योगिक विकासासाठी मैलाचा दगड ठरेल. अशा प्रकारच्या किमान २० लॉजिस्टिक पार्कची नागपुरात गरज असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

‘Mungerilal ke haseen sapne’: Fadnavis mocks Rahul Gandhi over Modi govt collapse claim

महत्वाच्या बातम्या