प्रांजल खेवलकर प्रकरणात पुणे पोलिसांची रोहिणी खडसेंनाही नोटीस, दीड तास चौकशी

विशेष प्रतिनिधी

पुणे : प्रांजल खेवलकर प्रकरणात पुणे पोलिसांनी त्यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनाही नोटीस पाठविण्यात आली आहे. रोहिणी खडसेंची दीड तास अमली पदार्थ विरोधी विभागाकडून चौकशी करण्यात आली. Rohini Khadse

प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पोलिसांकडून रोहिणी खडसेंना नोटीस जारी झाली. दीड तासाच्या चौकशीनंतर रोहिणी खडसेंचा जबाब नोंदवण्यात आला.



कथित ‘ड्रग पार्टी’ प्रकरणात प्रांजल खेवलकरला जामीन

खराडी येथील हॉटेलमध्ये झालेल्या कथित अमली पदार्थ पार्टी प्रकरणात रोहिणी खडसे यांचे पती व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांचे जावई असलेल्या खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली होती. डॉ. प्रांजल खेवलकरला पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्याचबरोबर फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये प्रांजल खेवलकर यांनी ड्रग्जचे सेवन केले नसल्याचे म्हटले आहे.

खराडीतील ‘हॉटेल स्टेबर्ड’मधील एका खोलीत २७ जुलै रोजी सुरू असलेल्या अमली पदार्थ पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला. प्रांजल खेवलकर याच्यासह सात आरोपींना अटक केली. आरोपींकडून २.७० ग्रॅम कोकेनसदृश पदार्थ, ७० ग्रॅम गांजा, हुक्का सेट, दारूच्या बाटल्या, दोन वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस कोठडीत प्राथमिक चौकशी झाल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती.

Pune Police also issues notice to Rohini Khadse in Pranjal Khewalkar case

महत्वाच्या बातम्या