विशेष प्रतिनिधी
सातारा :Sharad Pawar रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 2026 ते 2029 या कालावधीसाठी शरद पवार हेच संस्थेचे अध्यक्ष राहणार आहेत. अध्यक्षपदासाठी त्यांच्याशिवाय अन्य कोणताही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची निवड निर्विवाद ठरली.Sharad Pawar
शरद पवार म्हणाले, संस्थेच्या कार्यपद्धतीचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपण कुठे कमी पडलो, आणखी काय नवीन करता येईल, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी जो आदर्श निर्माण केला, तोच वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.Sharad Pawar
शरद पवार म्हणाले, शिक्षण क्षेत्रात बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याची आवश्यकता आहे. जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा वापर वेगाने वाढत असून रयत शिक्षण संस्थेलाही या नव्या प्रवाहासोबत पुढे जावे लागेल. जग बदलत आहे आणि आपणही त्या बदलाचा भाग व्हायला हवे. ग्रामीण भागातील विद्यार्थीही आता AI विषयी बोलत आहेत, ही समाधानाची बाब आहे.Sharad Pawar
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी यंदा मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय संस्थेकडून घेण्यात आल्याची माहिती देत शरद पवार संस्थेला हितचिंतकांकडून मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळत असल्याचे सांगत त्यांनी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विशेषतः रामशेठ ठाकूर यांनी यंदा तीन कोटी रुपयांहून अधिक निधी संस्थेला दिल्याचे त्यांनी जाहीर केले. या आर्थिक मदतीच्या जोरावर विद्यार्थ्यांसाठी नवीन उपक्रम राबवण्याची तयारी सुरू आहे.
रयत शिक्षण संस्थेचे शैक्षणिक जाळे अधिक व्यापक करण्यासाठी परदेशातील नामांकित संस्थांशी सहकार्य करण्यावरही भर दिला जाणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, त्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण आणि अनुभव मिळावा यासाठी परदेशी शिक्षण संस्थांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नव्या पिढीसमोर चांगल्या कामाचा आदर्श उभा राहावा, यासाठी संस्थेतील सेवक आणि शिक्षकांनी अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
Sharad Pawar re-elected unopposed as president of Rayat Shikshan Sanstha
महत्वाच्या बातम्या
- सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला
- सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा 2024मधील विक्रम; १ लाख १२ हजार २६८ मतांनी आघाडीवर
- विजयचा दणका, स्टॅलिन यांच्यासह द्रमुक मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री पिछाडीवर
- बंगाल-आसाममध्ये भाजपची झेप; तामिळनाडूत थलपती विजयच्या पक्षाची ‘ब्लॉकबस्टर’ एन्ट्री, केरळमध्ये काँग्रेसला दिलासा