सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा 2024मधील विक्रम; १ लाख १२ हजार २६८ मतांनी आघाडीवर

विशेष प्रतिनिधी

बारामती: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिवंगत अजित पवार यांचा मताधिक्याचा विक्रम मोडला आहे.

तेराव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांना एकूण १ लाख १२ हजार २६८ मतं मिळाली आहेत. तेराव्या फेरीत सुनेत्रा पवार यांना ८५६९ मतं मिळाली आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी अजित पवारांचा 2024मधील विक्रम मोडला आहे. २०२४ मध्ये अजित पवारांचा १ लाख १ हजारांनी विजय झाला होता.



महाराष्ट्रातील राहुरी आणि बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर होणाऱ्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह 23 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र एकाही उमेदवाराला तीन आकडी मते मिळाली नाहीत. सुनेत्रा पवार यांच्यानंतर सर्वाधिक मते नोटाला मिळाली आहेत.

बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विजयी मिरवणुका आणि गुलालाची उधळण करू नका, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.

बारामती पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू असताना सुनेत्रा पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असे लिहिले की, आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते. आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत.’

Sunetra Pawar breaks Ajit Pawar’s 2024 record, leads by 1.12 lakh votes

महत्वाच्या बातम्या