सुप्रिया सुळे या व्होट जिहादच्या माध्यमातून खासदार, नीतेश राणे यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे या व्होट जिहादच्या माध्यमातून खासदार या फतवे काढून खासदार झाल्यात. त् त्यामुळे त्यांच्यासारख्या मानसिकतेचे लोक या देशात महिलांना अधिकार मिळू देणार नाहीत असा दावा भाजप नेते आणि मंत्री नीतेश राणे यांनी केला आहे. Nitesh Rane

नीतेश राणे म्हणाले, सुप्रिया सुळे यांची भूमिका लव्ह जिहादच्या समर्थनाची आहे. तुम्ही त्यांचे यासंबंधीचे व्हिडिओही असंख्यवेळा पाहिले. त्या केवळ फतवे काढून खासदार झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत त्या कोणकोणत्या मस्जिदींत गेल्या व तेथून फतवे काढून त्या खासदार झाल्या हे सर्वांनी पाहिले. त्या केवळ व्होट जिहादच्या निमित्ताने निवडून आल्या. त्यामुळे या मानसिकतेचे लोक हिंदू राष्ट्रात किंवा या राष्ट्रात महिलांना अधिकार मिळू देणार नाहीत हे स्पष्ट आहे.



मी छाती ठोकून सांगतो की, मी कोणत्याही गोल टोपी व दाढीवाल्यांमुळे आमदार झालो नाही. मी हिंदू समाजाने मला निवडून दिल्यामुळे आमदार झालो. त्यामुळे कुणीही हिंदूंनाी धमकावू किंवा भीती घालू नका. तुम्ही आमचा तिसरा डोळा उघडला, तर शुक्रवारी तुमचा सिलिंडरही वर येणार नाही एवढी दक्षता बाळगा. चांगल्या पद्धतीने सावधगिरी बाळगा. कारण, या हिंदू राष्ट्रात हिंदू समाजाने आशीर्वाद देऊन आम्हाला इथे बसवले आहे, असे राणे म्हणाले.

मी मंत्रालयात बसतो किंवा इथे आलो ते एक आमदार किंवा मंत्री म्हणून नव्हे तर एक हिंदू म्हणून तुमच्याशी संवाद साधण्यासाठी व तुम्हाला ताकद देण्यासाठी आलो आहे. त्यामुळे तुम्ही निवांत राहा. आम्हाला मतांची काळजी नाही. त्यांची 5 मते कमी झाली, तर हिंदू समाजाची 50 मते आम्हाला मिळतील. त्यामुळे त्याची चिंता करू नका. हिंदू समाजाची ताकद काय आहे हे आम्हाला चांगले माहिती आहे, असेही राणे यांनी सांगितले.

Supriya Sule elected through ‘vote jihad’, claims Nitesh Rane

महत्वाच्या बातम्या