Devendra Fadnavis : उध्दव ठाकरेंनी वाचवले माझे हजार रुपये : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टाेला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Devendra Fadnavis : दसरा मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना टाेला मारला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना विकासाबाबत एक तरी मुद्दा मांडावा, असे आव्हान दिले हाेते. ठाकरेंनी भाषणात एकही मुद्दा मांडला नाही. त्यामुळे माझे हजार रुपये वाचविले असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर गुरुवारी झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची खिल्ली उडवताना मुख्यमंत्री म्हणाले, मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानेन की उद्धव ठाकरे यांनी माझे 1000 रुपये वाचवले. कारण मी आव्हान केले होते की, उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासासंदर्भात एक तरी मुद्दा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा. काल, मी तर काही त्यांचं भाषण ऐकलं, पण मी त्यांचं भाषण संपल्या बरोबर, जे भाषण ऐकणारे आहेत त्यांना आणि काही पत्रकारांना विचराले की, बाबा मला आता हजार रुपायंचा फटका आहे का? उद्धव ठाकरे काही तरी विकासावर बोलले का? अख्या भाषणात ते विकासासंदर्भात एक मुद्दाही बोलले नाहीत.



बोलूच शकत नाहीत,उद्धव ठाकरे केवळ अद्वा-तद्वा बोलतात. खरं म्हणजे, त्यांचं बोलणं हे स्वगत असतं. कारण पुढे माणसंही नव्हते. यावेळेस तर अशी परिस्थिती होती की, पुढे माणसंही नव्हती. त्यामुळे त्यांचं स्वगत होतं. पण तरीही त्यांचे आभार मानतो की, त्यांनी नेहमीच्या पद्धतीने लोकांच्या संदर्भात, विकासाच्या संदर्भात, लोककल्याण कसं करणार? राज्याला पुढे कसं नेणार? बीएमसीला पुढे कसं नेणार? यासंदर्भात अवाक्षरही न काढता, मी जे बोललो ते सत्य करून दाखवलं आणि माझे हजार रुपये वाचवले. त्याबद्दल आभार, अशी टीका फडणवीस यांनी केली.

Uddhav Thackeray saved my thousand rupees: Chief Minister Devendra Fadnavis’s toll

महत्वाच्या बातम्या