विशेष प्रतिनिधी
मुंबई : Aaditya Thackeray मुंबईतील जुन्या आणि धोकादायक सेस तसेच नॉन सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या गंभीर प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. विशेषतः येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत जीर्ण आणि धोकादायक अवस्थेतील इमारतींच्या दुरुस्ती तसेच पुनर्विकासासाठी मुख्यमंत्री विशेष निधीतून तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.Aaditya Thackeray
आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, मुंबईतील उपकरप्राप्त म्हणजेच सेस इमारतींसह नॉन सेस इमारतींचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या इमारतींच्या पुनर्विकासासाठी कायद्यात महत्त्वाचे बदल करण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने हजारो इमारतींचा पुनर्विकास रखडला असून लाखो भाडेकरू अनिश्चिततेत जीवन जगत आहेत.Aaditya Thackeray
मुंबईत सुमारे १४ हजारांहून अधिक जुन्या इमारती असून त्यामध्ये राहणाऱ्या लाखो नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्येक पावसाळ्यात इमारती कोसळण्याच्या घटना समोर येत असताना, यंदाही अनेक इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे सरकारने केवळ प्रशासकीय विषय म्हणून न पाहता मानवी सुरक्षेचा मुद्दा म्हणून पाहण्याची गरज असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. सर्व भाडेकरूंची योग्य नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात यावी, घरमालकांकडून होणाऱ्या दडपशाही आणि निष्कासन कारवाईपासून भाडेकरूंना संरक्षण द्यावे, तसेच अत्यंत धोकादायक स्थितीत असलेल्या सेस आणि नॉन सेस इमारतींच्या दुरुस्ती व डागडुजीसाठी पावसाळ्यापूर्वी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याशिवाय, पुनर्विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी सरकारने वैयक्तिक लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र आणि राज्यात सत्ता असलेल्या सरकारने या विषयावर ठोस निर्णय घेऊन लाखो मुंबईकरांना दिलासा द्यावा, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
मुंबईतील जुन्या इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न दरवर्षी पावसाळ्यात अधिक गंभीर बनत असताना, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मागण्यांवर काय भूमिका घेतात, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
Aaditya Thackeray writes to CM over Mumbai cess building crisis, seeks urgent redevelopment push
महत्वाच्या बातम्या
- सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला
- सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा 2024मधील विक्रम; १ लाख १२ हजार २६८ मतांनी आघाडीवर
- विजयचा दणका, स्टॅलिन यांच्यासह द्रमुक मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री पिछाडीवर
- बंगाल-आसाममध्ये भाजपची झेप; तामिळनाडूत थलपती विजयच्या पक्षाची ‘ब्लॉकबस्टर’ एन्ट्री, केरळमध्ये काँग्रेसला दिलासा