Vijay Shivtare : मुलीने दिले विजय शिवतारे याना जीवनदान

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Vijay Shivtare पुरंदरचे आमदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय शिवतारे यांना त्यांची कन्या डॉ. ममता शिवतारे यांनी स्वतःची किडनी दान करून नवजीवन दिले आहे. Vijay Shivtare

मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आज यशस्वीरित्या पार पडली असून, सध्या पिता-कन्या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
गेल्या काही काळापासून आमदार विजय शिवतारे हे किडनीच्या विकाराने त्रस्त होते. Vijay Shivtare



त्यांचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांना नियमित डायलिसिसवर राहावे लागत होते आणि त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. अशा कठीण प्रसंगी त्यांची कन्या डॉ. ममता शिवतारे या वडिलांच्या आयुष्यात ‘देवदूत’ बनून पुढे आल्या. केवळ एक कर्तव्यदक्ष मुलगीच नव्हे, तर एक डॉक्टर म्हणूनही त्यांनी वडिलांना या संकटातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.

विजय शिवतारे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. त्यांनी २००९ आणि २०१४ मध्ये सलग दोनदा विजय मिळवला होता. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला असला, तरी २०२४ मध्ये त्यांनी पुन्हा जोरदार मुसंडी मारत विजयश्री खेचून आणली. यापूर्वी त्यांनी राज्य मंत्रिमंडळात जलसंपदा राज्यमंत्री म्हणूनही यशस्वी जबाबदारी सांभाळली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव ते काही काळ सक्रिय राजकारणापासून दूर होते, मात्र आता यशस्वी शस्त्रक्रियेनंतर ते पुन्हा जोमाने जनसेवेत उतरतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.

Daughter Gives New Lease of Life to Vijay Shivtare

महत्वाच्या बातम्या