Gunaratna Sadavarte : दिल्लीत हाय अलर्ट; दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क

विशेष प्रतिनिधी

जालना: Gunaratna Sadavarte वैचारिक चर्चेमध्ये राज ठाकरे हारले तर त्यांनी उठाबश्या मारायच्या आणि मी जर हरलो तर राज ठाकरे जी म्हणतील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, असे आव्हान वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिले आहे.Gunaratna Sadavarte

गुणरत्न सदावर्ते हे जालन्यात असताना त्यांची गाडी विशाल कॉर्नर परिसरात आली तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सदावर्ते यांच्या गाडीवर शाईसह सुपाऱ्या फेकल्या. त्यानंतर तातडीने पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर देखील कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देण्यात येत होती.Gunaratna Sadavarte



गुणरत्न सदावर्ते म्हणाले, मी डंके की चोट पे हे म्हणेल, राज ठाकरे वैचारिक लढत लढण्याची कुवत संपली का रे बाबा? मनोज जरांगे तुझी वैचारिक कुवत संपली का रे बाबा? तुम्ही दोघे बाबा लोक झाले का रे बाबा? त्यामुळे मला यांच्या ज्या काही असंवेदनशील आणि आपप्रवृत्त विचार आहेत हे विचार भारतीय संविधान के ताकद को रोक नही सकती. ही डेमॉक्रसी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली डेमॉक्रसी आहे. भगवानबाबाने दिलेली शिकवण आहे. मा जिजाऊची शिकवण आहे. मा अहिल्यादेवी होळकरांची शिकवण आहे. त्यामुळे जी आशा विचारांनी लोक प्रेरित असतात ते अशा लोकांसमोर झुकत नसतात. कारण आम्ही वाळू वाले पण नाही आणि टन टन टोल वाले पण नाही आहोत.

आज जो काही प्रकार घडला त्यामध्ये ज्वलनशील पदार्थ होता, ते ऑइल आहे, त्यांचा जाळायचा उद्देश होता का? राज ठाकरे तुम्हाला सांगतो तुमच्या माणसांनी माझ्या गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला आहे. मी राज ठाकरे यांना आव्हान करतो की ते जिथे म्हणतील तिथे वैचारिक चर्चा करू, वैचारिक चर्चेमध्ये राज ठाकरे हारले तर त्यांनी उठाबश्या मारायच्या आणि मी जर हरलो तर राज ठाकरे जी म्हणतील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, असा थेट इशारा सदावर्ते यांनी दिला आहे.

Gunaratna Sadavarte challenges Raj Thackeray to do sit-ups if he loses

महत्वाच्या बातम्या