विशेष प्रतिनिधी
मुंबई : Tukaram Mundhe अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबईतील भेंडीबाजार आणि उमरखाडी परिसरातील 3 अत्यंत नामांकित हॉटेल्सचे परवाने थेट निलंबित केले आहेत. स्वयंपाकघरातील अस्वच्छता, कीटकांचा वावर आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.Tukaram Mundhe
आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील अत्यंत लोकप्रिय आणि नामांकित अशा तीन हॉटेल्सचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत. भेंडीबाजार आणि उमरखाडी परिसरातील या हॉटेल्सवर ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यप्रेमींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.Tukaram Mundhe
समोर आलेल्या माहितीनुसार, शालिमार हॉस्पिटॅलिटी, नूर मोहम्मदी हॉटेल आणि रहमानिया रेस्टॉरंटचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या हॉटेल्सनी स्वच्छता, अन्नसुरक्षा व परवाना नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या हॉटेल्सच्या स्वयंपाकघरात अस्वच्छता, कीटकांचा वावर आढळून आला, तसेच पिण्याच्या पाण्याबाबतचे नियमही या हॉटेल्सनी पाळले नसल्याचे समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
अन्न आणि औषध विभागाने केलेल्या तपासणीत कच्च्या मालाच्या नोंदी व खाद्यतेलाच्या गुणवत्तेच्या नोंदी नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या हॉटेल्सचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. त्याचबरोबर अमरावतीतील ‘अमरावती दरबार’ला विना वैध अन्न परवाना व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे. या कारवाईनंतर अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे एफडीएकmने स्पष्ट केले आहे.
एफडीएच्या हॉटेल्ससाठी महत्त्वाच्या सूचना
स हॉटेल्समध्ये ग्राहकांना मोफत आणि स्वच्छ पिण्याचे पाणी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्राहकाला बळजबरीने बाटलीबंद पाणी विकत घेण्याची सक्ती करता येणार नाही.
शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची साठवणूक आणि स्वयंपाक पूर्णपणे स्वतंत्र असणे आवश्यक आहे. यासाठी वेगवेगळे चॉपिंग बोर्ड वापरणे बंधनकारक आहे.
तळण्यासाठी वापरलेल्या काळ्या किंवा जळालेल्या तेलाचा पुन्हा वापर करता येणार नाही. तेलाच्या गुणवत्तेबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल.
वृत्तपत्रांमध्ये अन्नपदार्थ पॅक करण्यास पूर्णपणे बंदी आहे. त्यासाठी प्रमाणित फूड-ग्रेड रॅपिंग पेपरचा वापर करणे आवश्यक आहे.
कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी: किचनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दरवर्षी वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक आहे. तसेच स्वयंपाकघरात तंबाखू, गुटखा खाण्यास आणि थुंकण्यास सक्त मनाई आहे.
Tukaram Mundhe cracks down on three prominent Bhendi Bazaar hotels in Mumbai
महत्वाच्या बातम्या
- मोशी दुर्घटना प्रकरणात हलगर्जीपणा, महापालिका आयुक्तांना निलंबित करा : सुषमा अंधारे यांची मागणी
- Vijaya Rahatkar : उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल
- भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला; कोयताधारी हल्लेखोर फरार
- Sassoon Hospital : ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा