Sushma Andhare : केसरकरांसोबत प्रत्येक फोटोत दिसणारा तो ‘पिवळ्या शर्टाचा’ माणूस नेमका कोण? अशोक खरात प्रकरणात सुषमा अंधारे यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी

पुणे:  Sushma Andhare माजी मंत्री दीपक केसरकरांसोबत प्रत्येक फोटोत दिसणारा तो ‘पिवळ्या शर्टाचा’ माणूस नेमका कोण?” असा सवाल करत अशोक खरात प्रकरणात ‘ब्लॅक मनी व्हाईट’ करण्याचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्याउपनेत्या सुषमा अंधारे पत्रकार परिषद घेऊनसुषमा अंधारे पत्रकार परिषदेत काही छायाचित्रे दाखवली. यात एक पिवळा शर्ट घातलेला व्यक्ती प्रत्येक ठिकाणी केसरकर आणि अशोक खरात यांच्यासोबत दिसत आहे. नामकर्ण एकनाथ आवारे असे त्या व्यक्तीचे नाव आहे. अंधारे म्हणाल्या, “मी आधीही एमआयडीसी गेस्टहाऊसमधील फोटो दाखवले होते. हा माणूस केसरकरांसोबत नेमका काय करतोय? इतकेच नाही तर चाकणकर जेव्हा खरातची पाद्यपूजा करत होत्या, तेव्हाही हा व्यक्ती तिथे हजर होता. या माणसाचे नाव नामकर्ण एकनाथ आवारे असून तो ‘जगदंब पतसंस्थेचा’ प्रमुख आहे,” अशी माहिती अंधारे यांनी उघड केली.Sushma Andhare

नामकर्ण आवारे याच्या भूमिकेवर संशय व्यक्त करताना सुषमा अंधारे यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, “मी जेव्हा या आवारेची माहिती घेतली, तेव्हा अनेक बड्या नेत्यांचे आणि अधिकाऱ्यांचे ‘ब्लॅक मनी’ जगदंब पतसंस्थेमार्फत ‘व्हाईट’ करण्याचे काम हा माणूस करतो, असे दबक्या आवाजात बोलले जाते. जो माणूस अशा व्यवहारांसाठी ओळखला जातो, तो केसरकरांसोबत वारंवार का दिसतो? आवारे, खरात आणि केसरकर यांच्यात कोणते आर्थिक व्यवहार सुरू आहेत, याचे उत्तर केसरकरांनी दिले पाहिजे,” अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.Sushma Andhare



दीपक केसरकर यांनी आपल्यावर होत असलेले आरोप हे ‘कट कारस्थान’ असल्याचे म्हटले होते. पण सुषमा अंधारे यांनी हा आरोप फेटाळून लावला. यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, “केसरकर म्हणतात माझ्याविरोधात कारस्थान सुरू आहे, पण हे ऐकून मला दुःख वाटत नाही, तर त्यांचे विधान बालिश आणि हास्यास्पद वाटते. जर ते विचारत असतील की ३९ लोक सोडून मलाच का लक्ष्य केले जात आहे? तर याचा अर्थ असा होतो की, केसरकर स्वतः मान्य करत आहेत की ते अशोक खरातच्या संपर्कात होते. केसरकरांनी ‘भांडाफोड करेन’ अशी पोकळ धमकी देण्यापेक्षा, त्या ३९ लोकांची नावे एकदाची सांगूनच टाकावीत,” असे थेट आव्हान सुषमा अंधारे यांनी दिले.

अशोक खरात प्रकरणात ठाकरे गटाकडून याआधी देखील शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांचे खरातसोबतचे फोटो दाखवत गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दीपक केसरकर यांनी देखील पत्रकार परिषद घेतली. अशोक खरात प्रकरणाशी माझा संबंध नसल्याचे सांगत, त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. राजकीय द्वेषापोटी माझ्याविरोधात कट कारस्थान असल्याचे दीपक केसरकर म्हणाले होते. आज सुषमा अंधारे यांनी पुन्हा काही फोटो समोर आणून मोठे दावे केलेत.

Who Is the ‘Yellow Shirt Man’ Seen in Every Photo with Kesarkar?” Sushma Andhare Questions in Kharat Case

महत्वाच्या बातम्या