विशेष प्रतिनिधी
पुणे : एका शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्याला ‘पॉक्सो’ची धमकी देत ७ लाखांची खंडणी मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह तिघांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या तिघांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अजित त्रंबक बडे (सध्या सायबर पोलीस ठाणे), पोलीस शिपाई सुदाम बाळकृष्ण तायडे आणि दामिनी पथकातील रील स्टार म्हणून ओळखली जाणारी सोनाली गुलाबराव हिंगे (दोघेही शिवाजीनगर पोलीस ठाणे) यांचा समावेश आहे. या प्रकरणामुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, कर्तव्यातील हलगर्जीपणा व बेजबाबदार वर्तन केल्याप्रकरणी तिघातिघांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
फिर्यादी प्राचार्याच्या तक्रारीनुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणात संबंधित पोलिसांनी कर्तव्यात निष्काळजीपणा करत गैरवर्तन केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकारामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेतली आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील यांनी मुंबई पोलीस (शिक्षा व अपिले) नियम १९५६ तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून या तिघांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. पुढील विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत हे निलंबन कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
PSI Ajit Bade, Sonali Hinge Among 3 Suspended in Principal Blackmail Case
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर