विशेष प्रतिनिधी
महत्वाचे मुद्दे
१. धंगेकर दाम्पत्य ‘नॉट रिचेबल’, शोधासाठी विशेष पथके रवाना
२. सुसाईड नोट आणि व्हिडिओमधील गंभीर आरोप
३. अडीच कोटींची थकबाकी आणि आर्थिक मानसिक छळ
पुणे : Pune पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्याप्रकरणात माजी आमदार आणि शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. याप्रकरणात धंगेकर आणि त्यांच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार असल्याने, सध्या रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर हे दोघेही ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.
अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव; सोमवारी सुनावणी
रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर हे सध्या अज्ञातस्थळी असून स्वतःचा बचाव करण्यासाठी या दोघांनी अटकपूर्वक जामीन अर्ज मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. धंगेकर दाम्पत्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. मात्र, त्यापूर्वी पोलिसांनी अटक करु नये, म्हणून सध्या रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी अज्ञातस्थळी गेले आहेत. दुसरीकडे धंगेकरांच्या शोधासाठी पुणे पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी व्हिडिओ तयार करून गळफास घेत आत्महत्या केली होती. यामध्ये त्यांनी रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे, त्यांच्या पत्नी वर्षा शेडगे यांच्यासह अनेकांना आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरले होते. यानंतर स्वारगेट पोलीस ठाण्यात माजी आमदार धंगेकरांसह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नेमकं प्रकरण काय ?
बांधकाम व्यावसायिक आणि लेबर कॉन्ट्र्रॅक्टर खलील शेख यांनी एक व्हिडिओ क्लिप तयार करून आणि सुसाईड नोट लिहून गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी दोन चिठ्ठ्या लिहिल्या होत्या. एक चिठ्ठी त्यांनी ज्या इमारतीत आत्महत्या केली तिथे बाहेर चिकटवली होती, तर दुसरी चिठ्ठी त्यांच्या खिशात सापडली. पोलिसांनी ही सदरची चिठ्ठी पाहिली आणि त्यानंतर खलील शेखचा मृतदेह ससूनला पाठवण्यात आला. यानंतर काल संध्याकाळी खलील शेख याच्या पत्नीने केलेल्या तक्रारानुसार 14 जणांविरोधात फिर्याद नोंदवून घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिली होती. खलील शेख 2011 पासून पुण्यात बांधकामाची कामे करत होता. तो आरोपींकडे सेंट्रिगचे काम करत होता. खलील शेखने या कामासाठी बाहेरुन व्याजाने पैसे उचलले होते. आम्ही व्याजासहित पैसे दऊ, असे आश्वासन या सगळ्यांनी दिले होते. मात्र, यापैकी कुणीही पैसे न दिल्याने खलील तणावात होता. उत्कर्ष असोसिएट ही जी फर्म आहे, त्याठिकाणी रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांची पत्नी, बाळा शेडगे, रघू गौडा यांची पत्नी भागीदार आहेत.
मृताच्या पत्नीचा खळबळजनक आरोप
मृताची पत्नी सांगत होती, हे सगळे नावाला पार्टनर आहे. सगळा कारभार रवींद्र धंगेकर करतात. आता तपासात रोल काय होता, हे चेक करु. कोणाचं किती येणं आणि देणं येतं, हे तपासले जाईल. रवींद्र धंगेकर एका व्यक्तीकडे पैशासाठी खेटे मारत होता, पण कोणीही त्याचे पैसे देत नव्हते. खलील शेख याच्या पत्नीने सर्वांविरोधात 14 जणांविरोधात तक्रार नोंदवली आहे. खलील शेख याने चिठ्ठीत अडीच कोटी रुपयांचे येणे बाकी असल्याचे म्हटले आहे. हा गुन्हा गंभीर आहे. याप्रकरणात आम्ही योग्य ती कारवाई करु, असे स्वारगेट पोलिसांनी म्हटले होते.
Ravindra Dhangekar unreachable along with his wife; police teams on the trail!
महत्वाच्या बातम्या
- Dr Kumar Saptarshi : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको! पक्षातर्फे आवाहन
- पुण्याची वाहतूककोंडी फोडणार तीन महामार्ग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- आपलं म्हणणं खरं करणं यालाच हुकूमशाही म्हणतात, उद्धव ठाकरे यांची टीका