चाकणकर आणि ठोंबरे यांच्यातील वादाची ठिणगी पेटलेलीच; वादाची कारणं नेमकी काय?

विशेष प्रतिनिधी

पुणे:राष्ट्रवादी अजित पवार गटातील दोन महिला नेत्यांमधील वाद सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे.पक्षाच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर आणि पक्षाच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे यांच्यातील अंतर्गत नाराजीपुरता मर्यादित न राहता राजकीय संघर्ष झाला आहे.रूपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्यातील वादाचं कारण म्हणजे वर्चस्ववादाची लढाई, वैयक्तिक आरोप आणि राज्याचा महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर उपस्थित केलेले प्रश्न असल्याचे बोलले जाते.

वादाची सुरुवात कशी झाली…

विधान परिषदेवर संधी देण्याचा चर्चेदरम्यान रूपाली ठोंबरे यांनी अप्रत्यक्षपणे रूपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधत ‘ पक्षात एकच व्यक्तीला किती पद दिली जाणार? असा प्रश्न उपस्थित केला होता.या विधानानंतर ठोंबरे आणि चाकणकर यांच्यातील वाद प्रथमच उघडपणे समोर आला.

पुढे रूपाली ठोंबरे यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत म्हणाल्या होत्या की, रूपाली चाकणकर यांनी एका महिलेला हाताशी धरून त्यांचा कुटुंबावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकला.चाकणकर यांनी आरोप फेटाळून स्पष्ट केले होते की,राजकीय हेतूने हे सर्व केले जात आहे.



महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर दोघींमधील वाद अधिकच चिघळला. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदी जेव्हा रूपाली चाकणकर पदावर होत्या,तेव्हा त्यांच्याकडून महिलांना न्याय देण्याऐवजी मानसिक त्रास दिल्याचा आरोप रूपाली ठोंबरे यांनी केला होता. महिला अत्याचाराचा प्रकरणांमध्ये आयोगाची भूमिका पक्षपाती असल्याचा दावा ठोंबरे यांनी केला होता.

अशोक खरात प्रकरणात चाकणकर दोषी..

नाशिक मधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात ठोंबरे यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांचा महिला आयोग अध्यक्ष पदाची आणि राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामाची मागणी केली होती,तर अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांना मुख्य सूत्रधार करून त्यांना अटक करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, रूपाली ठोंबरे आणि रूपाली चाकणकर यांच्यातील वादाची पडलेली ठिणगी पक्षाचा अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नेमकी कशी शांत करणार, हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

The spark of the dispute between Chakankar and Thombre has been ignited; what exactly are the reasons for the dispute?

महत्वाच्या बातम्या