Jay Pawar : कुटुंबं म्हणुन आम्ही सर्वांनी एकत्र रहावे , जय पवार यांची भावनिक प्रतिक्रिया

विशेष प्रतिनिधी

पुणे : Jay Pawar दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीतची पोटनिवडणूक लागली आहे. बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांनी “या विषयावर अंतिम निर्णय सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि पक्षातील वरिष्ठ नेते घेतील. मी त्याबाबत बोलण्यासाठी अजून लहान आहे. मात्र कुटुंब म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र राहावे,” अशी भावनिक भूमिका जय पवार यांनी मांडली आहे.Jay Pawar

राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींमध्ये त्यांच्या पुत्र यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना जय पवार यांनी अत्यंत संयमित भूमिका मांडली आहे. बारामतीत ते माध्यमांशी बोलत होते.Jay Pawar



यावेळी बोलताना जय पवार म्हणाले की, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सर्वांची इच्छा आहे. “अजितदादांचे काम आणि लोकांवरील प्रेम पाहता बारामतीकर भावनिक आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशीच अपेक्षा आहे,” असे ते म्हणाले. काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. “गरज पडल्यास आम्हीही संवाद साधू. मात्र, बारामतीकरांचा पवार कुटुंबावर असलेला विश्वास आणि प्रेम लक्षात घेता या निवडणुकीत काय होईल, हे सर्वांनाच माहिती आहे,” असे म्हणत जय पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजित पवारांशिवाय निवडणूक लढवण्याची कल्पनाही केली नव्हती, असे जय पवार म्हणाले आहेत.

“We Must Stay United as a Family” – Jay Pawar’s Emotional Appeal

महत्वाच्या बातम्या