‘झूठ बोले कौवा काटे…’ म्हणत मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींच्या ‘मतचोरी’च्या आरोपावर चोख प्रतिवाद

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात केवळ ५ महिन्यांत तब्बल ८ टक्के मतदारवाढ झाल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याला “मतचोरी”चा प्रकार ठरवत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीसह राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर देत झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो…” असा सल्लाही दिला आहे. Rahul Gandhi

फडणवीसांनी राहुल गांधींच्या आरोपांवर निशाणा साधत फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात काँग्रेसचा झालेला पराभव तुमच्यासाठी वेदनादायी आहे, ते समजू शकतं. पण किती दिवस हवेत बाण मारत राहणार?”

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटमधून राहुल गांधींना उत्तर देताना राज्यातील अनेक विधानसभा मतदारसंघांतील वाढलेल्या मतदारांची आकडेवारी सादर केली. एकट्या नागपूरमध्येच नव्हे, तर राज्यातील किमान २५ मतदारसंघांमध्ये ८% पेक्षा अधिक मतदारवाढ झाली असून, अनेक ठिकाणी काँग्रेस किंवा त्यांच्या सहयोगी पक्षांचे उमेदवार विजयी झाले आहेत हे त्यांनी सांगितले की पश्चिम नागपूरमध्ये ७% (27,065) मतदार वाढले, तरी काँग्रेसचे विकास ठाकरे विजयी झाले. उत्तर नागपूरमध्ये ७% (29,348) मतदार वाढले, तरी काँग्रेसचे नितीन राऊत विजयी. वडगाव शेरी (पुणे) येथे १०% (50,911) मतदारवाढ असूनही शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे निवडून आले. मालाड पश्चिममध्ये ११% (38,625) मतदार वाढले, तरी काँग्रेसचे अस्लम शेख विजयी. मुंब्रा येथे ९% (46,041) मतदार वाढ असूनही शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले.यावरूनच मतदारवाढ हा सर्वसामान्य निवडणूक प्रक्रियेतील भाग असून, केवळ फडणवीसांच्या मतदारसंघापुरता हा प्रकार मर्यादित नाही, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी यांना टोला मारत मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की तुमच्या पक्षात संवादाचा अभाव इतका आहे की, अस्लम शेख, नितीन राऊत, विकास ठाकरे यांच्यासारख्या आपल्या पक्षातील नेत्यांशी एकदाही बोलल्याशिवाय अशा ट्विट्स करता. हा काँग्रेसमधील संवाद तुटण्याचा अत्यंत वाईट नमुना आहे.

राहुल गांधींनी आपल्याच ट्विटमध्ये म्हटलं होतं की, “मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काही बूथवर तब्बल २० ते ५०% पर्यंत मतदार वाढले असून, BLOs ने अनोळखी लोकांनी मतदान केल्याची तक्रार केली आहे. निवडणूक आयोग मात्र गप्प आहे. हे साधे ‘ग्लिचेस’ नाहीत, ही सरळ मतचोरी आहे.”डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित जाहीर करावे.

Chief Minister’s strong response to Rahul Gandhi’s ‘vote rigging’ allegation, saying ‘zut Bole Kouwa Kate…’

महत्वाच्या बातम्या